Sohail Khan Video
Sohail Khan Video Esakal
मनोरंजन

Sohail Khan Video: 'अर्ध नग्न होऊन कोण प्रॅक्टिस करतं?', बॉडी दाखवण्याच्या नादात सोहेल खान झाला ट्रोल

सकाळ डिजिटल टीम

कालच WPLची मोठ्या दिमाखात सुरवात झाली. WPLची चर्चा सुरु असतांनाच गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटी क्रिकेट लीगही चर्चेत आहेत. यात देशातील फिल्म इंडस्ट्रीतील जवळपास सर्व स्टार्स सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2023 खेळत आहेत. यंदाही या स्पर्धेत स्टार्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, आता मुंबई हिरोजच्या सोहेल खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. त्यालाही क्रिकेट खेळण्याचा खुप छंद आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे. मात्र यात व्हिडिओमध्ये सोहेल खान शर्टशिवाय सराव करताना दिसत आहे. सोहेल खानने स्वत: इन्स्टाग्रामवर सराव करत असतांनाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

व्हिडिओमध्ये सोहेल खान लाँग शॉट्स खेळतांना दिसत आहे. मात्र या व्हिडिओत नेटकऱ्याची नजर त्याच्या खेळीवर कमी आणि त्याच्या बॉडीवर जास्त आहे. त्याची शर्टलेस शैली त्याच्या फलंदाजीपेक्षा जास्त लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडिओमध्ये सोहेल खानची मजबूत बॉडी पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. अनेक लोक कमेंट करून तिच्या बॉडीचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, "सोहेल भाई बॉडी खूप मस्त बनवली आहे." एकाने लिहिले, "क्या बॉडी बनाया है भिडू, एक नंबर." एकाने लिहिले, "सलमान खान के भाई है आप, 6 पक्स तो होगा ही."

मात्र त्याच्या कौतुकाबरोबरच काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे. शर्ट किंवा टी-शर्ट न घालता फलंदाजीचा सराव केल्यामुळे सोहेल खानची काहींनी खिल्ली उडवली आहे. एका यूजरने त्याच्या पोस्टवर लिहिले की, "भाई बॉडीशिवाय चांगली फिल्म बनवा." तर एका यूजरने लिहिले की, "कोण असं नग्न सराव करतं."

सेलिब्रिटी क्रिकेट लीग 18 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे आणि तिचा अंतिम सामना 19 मार्च रोजी होणार आहे. या लीगची ही सातवा सिझन आहे. याची सुरुवात 2011 मध्ये झाली.

तर सोहेल बद्दल बोलयचं झालं तर 52 वर्षीय अभिनेता 'डरना मना है', 'कृष्णा कॉटेज', 'मैने प्यार क्यूं किया', 'गॉड तुस्सी ग्रेट हो' आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या कामासाठी ओळखला जातो.

त्याने 'औजार', 'हॅलो ब्रदर' आणि 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. नुकताच तो 'द कपिल शर्मा शो' मध्ये मनोज तिवारी, दिनेश लाल यादव, जिशु सेनगुप्ता, सोनू सूद, बिनू ढिल्लन, निंजा, राजीव पिल्लई, गणेश किशन, सुधीर बाबू आणि जीवा यांच्यासोबत CCL प्रमोट करण्यासाठी आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT