Sona Mohapatra  
मनोरंजन

सोना मोहपात्राला धमक्या; मुंबई पोलिसांकडे तक्रार करत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

स्वाती वेमूल

फाटक्या जीन्सवरील वादाप्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्यानंतर प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्राला धमक्यांचे मेसेज येऊ लागले आहेत. याप्रकरणी तिने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून इन्स्टाग्रामवरील कमेंट सेक्शनसुद्धा बंद केलं आहे. सोनाने गुरुवारी मुंबई पोलिसांनी टॅग करत लिहिलं, 'इन्स्टाग्रामवर मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. इतकंच नव्हे तर माझं अकाऊंट हॅक करण्याच्याही धमक्या दिल्या जात आहेत. माझ्यासाठी अपशब्द वापरले जात आहेत. ठराविक लोकं मिळून माझ्यावर निशाणा साधत आहेत. मी माझं कमेंट सेक्शन बंद केलं आहे.'

काय आहे संपूर्ण प्रकरण?
काही दिवसांपूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांवरून वादग्रस्त विधान केलं होतं. "गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालणाऱ्या महिला आपल्या मुलांना काय संस्कार देणार", असं ते एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला होता. याचप्रकरणी सोनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देवी कालीचा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'जगाला दाखवण्याइतपत माझे गुडघे संस्कारी नाहीत का?' सोनाच्या या पोस्टवरून तिला ट्रोल करण्यात आलं. याविषयी तिने नंतर ट्विटरवर लिहिलं, 'पाच दिवसांनंतरही मला धर्माच्या ठेकेदाऱ्यांकडून धमक्या येत आहेत, मला शिवीगाळ केली जातेय. आजच मी १०० हून अधिक लोकांना ब्लॉक केलंय आणि त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे.'

सोना मोहपात्रा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. विविध मुद्द्यांवर ती तिची परखडं मतं अनेकदा मांडत असते. मात्र यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: चाळीतली खोली ते 2BHK फ्लॅट! BDDवासियांना मिळाल्या नव्या घरांच्या चाव्या, ८६४ रहिवाशांची स्वप्नपूर्ती

चाबहार पोर्टजवळ अमेरिकेचे हल्ले, लढाऊ विमानातून बॉम्ब फेकल्यानं विध्वंस; भारतासाठी हे महत्त्वाचं बंदर

दुबईत ड्रोन हल्ल्यानंतर विमान उड्डाणं स्थगित, १९ भारतीयांसह ३५ जणांना युएईत अटक

Success Story : वडिलांचं सलूनचं दुकान, लेक बनला पीएसआय कवठेपिरानच्या ओंकार जाधवची ‘एमपीएससी’ परीक्षेत बाजी

IPL : विराट कोहलीने निवडली RCB ची आवडती प्लेइंग इलेव्हन; अनिल कुंबळेसह स्टार्क-चहललाही संधी

SCROLL FOR NEXT