sonakshi sinha  esakal
मनोरंजन

Sonakshi Sinha: लग्नाला यायचं हं! सोनाक्षीची पोस्ट चर्चेत

बॉलीवूडची दबंग गर्ल म्हणून सोनाक्षीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

सकाळ डिजिटल टीम

Sonakshi Sinha Good news: बॉलीवूडची दबंग गर्ल म्हणून सोनाक्षीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. काही दिवसांपूर्वी सोनाक्षीचे नाव हे खान कुटूंबातील एका सदस्याशी जोडले गेल्यानं नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. सोनाक्षीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर झाली असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

सोनाक्षीनं इंस्टावर जो लूक शेयर केला आहे त्यामुळे ती आता लग्नाची तयारी करत असल्याचे दिसून आले आहे. त्या फोटोमध्ये ती एका ब्रायडल अवतारामध्ये दिसून येत आहे. चाहत्यांना तिचा तो लूक कमालीचा आवडला आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनाक्षीनं लिहिलं आहे की, मला आता लग्नाचे वेध लागले आहे. पण मी खूप साधारण वधू होईल असे मला वाटते. लग्नामध्ये देखील मला फार काही नटता येणार नाही. सोनाक्षीच्या त्या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

सोनाक्षी पुढे म्हणते की, मी सगळ्यात जास्त माझ्या आईच्या जवळ आहे. तिचं आणि माझं नातं हे सर्वात जवळचे आहे. मला वाटतं माझी आई सर्वात सुंदर स्त्री आहे. मला तिचा अभिमान आहे. मला तर अनेकजण म्हणतात की, तू तुझ्या आईसारखी दिसते. सोनाक्षीनं शेयर केलेल्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोनाक्षी तू आता लग्नाची तयारी सुरु केलेली दिसतेस. यासगळ्यावर दबंग अभिनेत्री सोनाक्षीनं शेयर केलेल्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोनाक्षीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, काही महिन्यांपूर्वी तिचा डबल एक्स एल प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा जेमतेम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. त्यात तिच्या जोडीला हुमा कुरैशी देखील होती. आता ती ककुडामध्ये रितेश देशमुख आणि साकिब सलीमसोबत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT