sonalee kulkarni and phulwa khamkar dance tribute to gaarava marathi album completes 25 years at dadar shivaji park on SAKAL
मनोरंजन

Sonalee Kulkarni Garva Dance: गारवाला २५ वर्ष! सोनाली कुलकर्णी - फुलवाचा भर पावसातला गारवा डान्स बघाच

आज गारवाला २५ वर्ष पुर्ण झाली असली तरीही या अल्बमची जादू कायम आहे.

Devendra Jadhav

Sonalee Kulkarni Gaarva Dance Video News: मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीची आजवर अनेक गाणी आणि सिनेमे प्रेक्षकांना आवडले आहेत. सोनालीचे डान्स व्हिडीओ प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.

अप्सरा आली असो, मितवा असो अशी अनेक गाणी आणि त्यावर सोनालीने केलेला डान्स आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अशातच सोनाली आणि नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी खास गारवा डान्स केलाय. जो सर्वांना आवडत आहे.

(sonalee kulkarni and phulwa khamkar gaarava dance at dadar shivaji park on gaarava marathi album completes 25 years)

सोनाली - फुलवाचा गारवा डान्स

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले की एक गाणं सर्वांच्या प्लेलिस्ट मध्ये असतंच. ते म्हणजे गारवा. गारवा ऐकलं नाही असा माणुस सापडणार नाही. आज 'गारवा'ला २५ वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सोनाली कुलकर्णी - फुलवा खामकर यांनी भर पावसात गारवा डान्स केलाय.

गारवाला २५ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने सोनाली - फुलवाने गारवाच्या ओळींवर सुंदर डान्स केलाय. या दोघींच्या गारवा डान्सला प्रेक्षकांनी पसंती दिलीय. याशिवाय लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

कुठे केलाय डान्स आणि काय म्हणाली सोनाली?

सोनाली - फुलवाने शिवाजी पार्कला समुद्राच्या ठिकाणी जी नवीन जागा बांधलीय तिथे डान्स केलाय. या व्हिडीओत मागे बांद्रा - वरळी सी लिंक दिसतंय. याशिवाय फेसाळणारा आणि उधाळणारा समुद्र दिसतोय.

हा व्हिडीओ शेअर करत सोनाली म्हणाली.. या गाण्याच्या, अल्बमच्या गेली अनेक वर्ष प्रेमात आहोत… त्याचा गारवा आजही, तसाच जाणवतो, ताज़ा ताज़ा… थंडगार, आजही मनात गुदगुल्या होतात, अंगावर शहारे येतात…

या गाण्यांवर नाचत, गात, आज अनेक पावसाळे अनुभवलो, जगलो …आज “गारवा” ला २५ वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्ताने आमच्याकडून हे एक छोटंसं.. अशा भावना सोनालीने व्यक्त केल्या

गारवा अल्बम बद्दल थोडंसं..

१९९८ साली आलेला गारवा अल्बमने सर्वांना अक्षरशः प्रेमात पाडलं. ऊन जरा जास्त आहे असं म्हणत किशोर कदम आणि मिलींद इंगळेंच्या या अल्बमने सर्वांच्या काळजात घर केलं.

आज गारवाला २५ वर्ष पुर्ण झाली असली तरीही या अल्बमची जादू कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT