Sonalee Kulkarni entry in tollywood, debut in south Malayalam Movie Instagram
मनोरंजन

Sonalee Kulkarni: 'या' साऊथ सुपरस्टार सोबत सुरु होणार सोनालीचा टॉलीवूड प्रवास...पोस्टनं वेधलं लक्ष

सोनाली कुलकर्णी लवकरच तिच्या पहिल्या-वहिल्या मल्य़ाळम सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

प्रणाली मोरे

Sonalee Kulkarni: अभिनयासाठी भाषा हा अडसर कधीच नव्हता...आज अनेक वर्षांनी का होईना पण एक चांगलं चित्र अभिनय क्षेत्रात दिसत आहे की अनेक कलाकार वेगवेगळ्या भाषेतील सिनेमात काम करु लागले आहेत. आपल्या इंडस्ट्रीपुरतं मर्यादित न राहता दुसऱ्या इंडस्ट्रीतही आपलं नशीब आजमावताना दिसत आहेत. बॉलीवूड-टॉलीवूडनं हा प्रवास कधीच सुरु केलाय..(Sonalee Kulkarni entry in tollywood, Malayalam Movie)

गेल्या काही वर्षात त्याचं प्रमाण वाढलं देखील आहे...पण आता मराठी कलाकारांनाही टॉलीवूडची वाट खुणावू लागली आहे. आपल्या सर्वांची लाडकी अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी आता टॉलीवूडच्या प्रवासासाठी सज्ज झाली आहे. सोनालीनं नवीन वर्षातील आपली पहिली पोस्ट करत ही गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सोनाली कुलकर्णी लवकरच मल्याळम सिनेमात काम करुन टॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. सोनालीनं सिनेमाचं पोस्टर शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. सोनाली काम करत असलेल्या सिनेमाचं नाव आहे...Malaikottai Vaaliban. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनालीला साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत झळकण्याची संधी मिळणार आहे. सिनेमाच्या शूटिंगसाठी सोनालीनं केरळ गाठलं आहे.

नवीन वर्षातील या नव्या प्रवासाचा अनुभव घेण्यास आपण सज्ज आहोत आणि खूप आनंदही झालाय अशा पद्धतीची नोट सोनालीनं पोस्ट करत लिहिली आहे.

सोनालीच्या या नव्या प्रवासासाठी मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारां सोबतच तिच्या चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सोनालीचा 'व्हिक्टोरिया' हा मराठी सिनेमाही आपल्याला लवकरच भेटीस येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coaching Center Blast: भयंकर! कोचिंग सेंटरमध्ये मोठा स्फोट, दोन विद्यार्थी जागीच ठार, अनेक जखमी, घटनेने खळबळ

Madha Flood Crisis : मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा : गोपीचंद आमदार पडळकर

Latest Marathi News Live Update : पिकविमा जुलैमध्ये सुरू करण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

FASTag New Rule : आता नाही द्यावा लागणार डबल टोल! 'UPI पेमेंट'ने पैसे वाचणार

KDMC News : 14 गाव, 27 गाव आताच बाहेर काढून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करा, 27 गाव संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT