sonalee kulkarni,kunal benodekar file image
मनोरंजन

'मराठी मुलगा भेटला नाही का?' सोनालीनं दिलं भन्नाट उत्तर

सोनाली कुलकर्णीने ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली आहे.

प्रियांका कुलकर्णी

मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णीने (sonalee kulkarni) ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरशी (kunal benodekar) लग्नगाठ बांधली आहे. वाढदिवसानिमित्त तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. अत्यंत साध्या पद्धतीने सोनाली आणि कुणाल विवाहबद्ध झाले. सोनाली आणि कुणालवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. नुकताच सोनालीने कुणालसोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये दोघे झोपाळ्यावर बसलेले दिसत आहेत. या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली. त्या कमेंटवर सोनालीचे उत्तर वाचून अनेकांना हसू आवरले नाही.(sonalee kulkarni give reply to user regarding marriage with marathi boy)

सोनालीच्या फोटोला कमेंट करून एका नेटकऱ्याने प्रश्न विचारला,' एखादा मराठी मुलगा भेटला नाही का लग्न करायला?' या कमेंट ला रिप्लाय देत सोनाली म्हणाली,'मराठीच आहे' अनेकांना कुणाल परदेशात राहात असल्याने तो मराठी नाही असे वाटत होते.आता सोनालीने या नेटकऱ्याला उत्तर देऊन सोशल मीडियावर कुणाल मराठी असल्याचे स्पष्ट केले. अनेकांनी ही कमेंट करण्याऱ्या नेटकऱ्याला रिप्लाय देऊन सुनवले आहे. एकाने कमेंट केली,'फालतू चौकशा करायच्या कशाला?' सोनालीला ट्रोल करायाचा प्रयत्न करणाऱ्या या नेटकऱ्याला अनेकांचे बोलणं ऐकावे लागले.

सोनाली कुणालसोबतचे फोटो सोशल मीडिवर नेहमी शेअर करत असते कुणाल आणि सोनाली हे दोघेही फिटनेस फ्रिक आहेत. कुणालसोबत वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ सोनाली सोशल मीडियावर शेअर करते.गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दुबईतच सोनाली आणि कुणालचा साखरपुडा पार पडला. सोनालीचा पती कुणाल हा लंडनचा असून कामानिमित्त तो दुबईत वास्तव्यास असतो.

soanalee post

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT