sonalee kulkarni  
मनोरंजन

Sonalee Kulkarni 'आता मी खपवून घेणार नाही'; नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली सोनाली

ट्रोलिंगविरोधात सोनालीने उठवला आवाज

स्वाती वेमूल

मराठी चित्रपटसृष्टीतील 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी Sonalee Kulkarni नुकतीच विवाहबंधनात अडकली. दुबईतल्या एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने तिने कुणाल बेनोडेकरशी Kunal Benodekar लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर एकीकडे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे तिच्या लग्नाविषयी काही आक्षेपार्ह कमेंट्ससुद्धा नेटकऱ्यांकडून पोस्ट केल्या जात आहेत. अशा नेटकऱ्यांना सोनालीने सडेतोड उत्तर दिलं आहे. (sonalee kulkarni lashes out at a netizen who commented on her marriage)

काय म्हणाली सोनाली?

'आता मुलं झाल्यावर येणार असेल नाही तर नागरिकता कशी मिळेल त्याला?,' असा टोला नेटकऱ्याने लगावला. त्यावर 'मित्रा UAE हा देश परदेशी लोकांना नागरिकत्व प्रदान करत नाही. त्यामुळे उठ-सूट बोलायचं नाही. जरा अभ्यास करा,' हे उत्तर सोनालीने दिलं. इतक्यावरच न थांबता त्या नेटकऱ्याने आणखी एक कमेंट पोस्ट केली. 'मला वाटलं अमेरिकेत लग्न केलं असेल आणि दुबईत लग्न केलं म्हणजे मुलं तेथे होईल अशी शक्यता पण नाही', अशी कमेंट त्याने केली. त्यावर सोनालीने उत्तर दिलं, 'तुम्हाला काहीही वाटू शकतं आणि तुम्ही आम्हाला काहीही बोलू शकता. हे आता खपवून घेणार नाही, किमान मी तरी नाही. समाजभान ठेऊन वागणे, समाजाला देणे लागणे, देऊ करणे, जबाबदार नागरिक म्हणून वावरणे, माणुसकी जपणे हे सगळं आम्ही करायचं आणि तुम्ही फक्त बसून अश्या फुकट कमेंट्स टाकायच्या.'

आणखी एका नेटकऱ्याने परदेशात मजा करण्याऐवजी कोव्हिड काळात मदत करावी, असा उपरोधिक टोला सोनालीला लगावला. सोनालीने त्यावरही उत्तर देत ट्रोलिंगविरोधात आवाज उठवला. 'खरंच का? तुम्ही, आम्ही केलेली मदत पाहिली नाही, म्हणून आम्ही काही केलंच नाही, किंवा करतंच नाही, असं होत नाही. मी काय मदत केलीये ती बोंबलून सांगणं मला तरी योग्य वाटत नाही. असो, सगळ्यांना एकाच पठडीत बसवणं चुकीचं आहे', अशा शब्दांत सोनालीने ट्रोलरला सुनावलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT