Sonalee Kulkarni, Sayli Sanjeev -#patlatarghya # hashtag Trend  Instagram
मनोरंजन

#patlatarghya#- मराठी कलाकार म्हणतायत,'पटलं तर घ्या..', काय आहे भानगड?

सध्या ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर सोनाली कुलकर्णी ते सायली संजीवपासून सगळ्यांनीच पटलं तर घ्या हा हॅशटॅग आपल्या पोस्टमध्ये वापरलेला दिसतोय.

प्रणाली मोरे

#patlatarghya # hashtag Trend :सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच एकत्र नांदतात. इथे प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयु्ष्यातील अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात. चाहते आणि सेलिब्रिटी यांच्यातील एक उत्तम धागा म्हणजे हा सोशल मीडिया. (Sonalee Kulkarni, Sayli Sanjeev -#patlatarghya # hashtag)

इथे सेलिब्रिटींनी एखादी पोस्ट केली की ती लागलीच व्हायरल झालीच पाहिजे. किंवा एखादा हॅशटॅग त्यांनी वापरला की तो ट्रेन्ड झालाच पाहिजे. सध्या ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर 'पटलं तर घ्या..' हा हॅशटॅग ट्रेन्ड होताना दिसतोय. अन् 'पटलं तर घ्या..' नक्की काय भानगड आहे यावरनं तर्क वितर्क लावले जात आहेत.

#patlatarghya # hashtag Trend

कलाकार अनेकदा एखादा हॅशटॅग वापरतात तो त्यांच्या नव्या कलाकृतीविषयी अंदाज देणारा असतो. पण पटलं तर घ्या हा हॅशटॅग सोनालीनं वापरला आहे तो तिच्या व्हिक्टोरिया सिनेमाच्या प्रमोशनल पोस्टमध्ये...सायली संजीवनं तिच्या एका फोटो पोस्टसाठी हा हॅशटॅग वापरला आहे. ज्यात ती खरंतर साडी, डिझायनर ब्लाऊज आणि एकंदरीत लूकला प्रमोट करताना दिसतेय.

तसंच, अनेक कलाकारांनी आपल्या पोस्टसोबत पटलं तर घ्या हा हॅशटॅग वापरल्यानं लोकांना काही कळेनासं झालंय. आता इतके सगळे कलाकार एकत्र पटलं तर घ्या चा हॅशटॅग वापरत असल्यानं या नावाचा सिनेमा येतोय की एखादा शो असे प्रश्न देखील लोक विचारताना दिसत आहेत.

एक मात्र आहे नवीन काही तरी नक्कीच भेटीस येणार आहे. नाहीतर इतके सगळे कलाकार 'पटलं तर घ्या..' असं का बरं एकाच वेळेस प्रमोट करतील. अर्थात जे घडणार आहे ते छोटा पडदा, मोठा पडदा की ओटीटीवर..? हे चित्र देखील लवकरच स्पष्ट होईल. आणि मनोरंजनाची ती मोठी ट्रीट असणार यात शंकाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News : येवल्याजवळ भीषण अपघात: भरधाव फॉर्च्युनर पलटी; तीन साईभक्तांचा मृत्यू

Bank Director Rule : वर्षांनुवर्षे सहकारी बँकेत तळ ठोकलेल्या संचालकांना बसणार दणका! आमदार, खासदारांना फटका

Latest Marathi News Live Update : मुंबईतील KEM रुग्णालयात डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला

Shreyas Iyer ने दुखापतीनंतर पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल...'

ये है मोहब्बतें मालिकेतील इशिताला व्हायचंय आई! दिव्यांका त्रिपाठी आई होणार? म्हणाली...'लवकरच तुम्हाला गोड बातमी..'

SCROLL FOR NEXT