sonalee kulkarni wedding : लग्न म्हणजे अनमोल क्षणांची तिजोरी. त्याला आपले कलाकार ही अपवाद नाहीत. या कलाकारांचा लग्नसोहळा कसा साजरा केला जातो, त्यांनी लग्नात कोणते कपडे घातले असतील, काय दागिने घातले होते, जेवणाची पंगत कशी रचली होती, त्यांनी किती धमाल केली असेल अशा अनेक गोष्टी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. चाहत्यांची हिच उत्सुकता लक्षात घेऊन ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर महाराष्ट्राची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी(Sonalee Kulkarni) आणि कुणाल बेनोडेकर यांचा भव्य विवाह सोहळा पाहता येणार आहे. गुरुवारी ११ ऑगस्ट रोजी हा सोहळा प्रदर्शित झाला. आता या लग्नातल्या एक एक गोष्टी समोर येत आहेत. (sonalee kulkarni talks about how kunal benodekar proposed her in wedding video on planet marathi nsa95)
सोनाली आणि कुणाल यांनी २०२१ मध्ये दुबईमध्ये रजिस्टर लग्न केलं होतं. पण त्यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा लंडनमध्ये मराठमोळ्या पद्धतीने विधीवत लग्नगाठ बांधली. हा लग्नसोहळा आता प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित झाला आहे. यातील एका व्हिडीओमध्ये सोनाली कुलकर्णीने तिच्या प्रपोजचा किस्सा सांगितला आहे. सोनाली म्हणते, 'माझी आणि कुणालची भेट २०१७ मध्ये काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून झाली. आम्ही ऑनलाइन पहिल्यांदा भेटलो होतो. चॅटवर बोलणं झालं होतं. एकमेकांबद्दल जाणून घ्यायला सुरुवात झाली, मग मैत्री झाली. पहिल्यांदा लंडनमध्ये भेटलो. मी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले होते. मग तो दुबईमध्ये शिफ्ट झाला. आमच्या भेटी वाढल्या.'
सोनाली पुढे सांगते, '२ वर्षांनंतर मी त्याला अक्षरशः धमकी दिली होती. या भेटीनंतर जर का तू पुढे काही ऑफिशियल केलं नाही तर माझे आई-वडील मला काही तुला भेटायला पाठवणार नाहीत. आमच्या भेटीची शेवटची संध्याकाळ होती तेव्हा तो मला दुबईच्या सगळ्यात उंचीवरच्या ठिकाणी घेऊन गेला आणि आम्ही एक झीप लाइन रोलर कोस्टर राइड केली. सूर्यास्ताची वेळ होती आणि अशा सुंदर संध्याकाळी तो मला प्रोपज करणार असं मला वाटत होतं. मी त्याची आतुरतेनं वाट पाहत होते. पण त्यावेळी तसं काहीच घडलं नाही.”
कुणालच्या प्रपोजबद्दल सांगताना सोनाली म्हणाली, 'दुसऱ्या दिवशी माझी फ्लाइट होती. सकाळी मी त्याच्याकडे रुक्ष नजरेनं पाहिलं आणि त्याला मला एअरपोर्टला सोडायला सांगितलं. मी लिफ्टपाशी उभी होते. अचानक कुणालने मला आतून हाक मारली आणि तू काही विसरत तर नाहीयेस ना? असं म्हणत ओव्हरअॅक्टिंग करून त्याने मला पुन्हा आता बोलावलं आणि माझ्या आवडीचं गाणं लावलं. त्याने मला त्यावेळी तिथेच प्रपोज केलं. यावर माझं म्हणणं असं होतं की तू हे काल का नाही केलं. त्यावर तो मला म्हणला की मी कालच तुला प्रपोज करणार होतो पण मी त्यावेळी अंगठी विसरलो होतो.” अशा प्रकारे कुणालचा सूर्यास्ताच्या वेळी सोनालीला रोमँटिक प्रपोज करण्याचा प्लान फसला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.