Sonali Kulkarni apologises after calling Indian women lazy sadi Have learned a lot from this incident sakal
मनोरंजन

Sonali kulkarni: महिलांना आळशी म्हणणं भोवलं! अखेर सोनाली कुलकर्णी यांनी मागितली माफी..

सोनाली कुलकर्णीने काही दिवसांपूर्वी महिलांविषयी एक विधान केले होते.

नीलेश अडसूळ

Sonali kulkarni: केवळ अभिनयच नाही तर एकूणच समाजभान, वैचारिक वलय आणि स्वतःचा दर्जा राखून असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. त्यांना मराठी मनोरंजन विश्वात गंमतीने मोठी सोनाली कुलकर्णी म्हंटलं जातं. आपल्या कलाकृतीं सोबतच त्या स्पष्ट आणि सडेतोड विधानांसाठी ओळखल्या जातात.

सध्या त्यांच्या एका विधानावरून बराच गदारोळ झाला आहे. 'भारतीय मुली आळशी आहेत, त्यांना चांगला कमावणारा नवरा हवा असतो' अशा आशयाचे विधान त्यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यावरून मोठा वाद झाल्याने अखेर सोनाली यांनी एक पत्र जाहीर करत सर्वांची माफी मागितली आहे.
(Sonali Kulkarni apologises after calling Indian women lazy sadi Have learned a lot from this incident)

गेली दोन दिवस सोनाली यांचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. यावर कुणी चांगलं मत व्यक्त केलं तर अनेकांनी टीकाही केली. यावर सोनाली काय व्यक्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सोनाली यांनी या प्रकरणावर मौन सोडलं आहे.

एक पत्र लिहून त्यांनी ट्वीट केलं आहे. यामध्ये तिने कोणत्याही महिलेला दुखवायचा तिचा हेतू नव्हता असे म्हंटले आहे. या ट्विट मध्ये ती म्हणते, 'मला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आहे तो पाहून मी भारावून गेले आहे. यासाठी मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. खासकरून प्रेस आणि मीडियातील लोकांचे.. ज्यांनी माझ्याशी खूपच समंजसपणे संपर्क आणि संवाद साधला.'

'एक महिला म्हणून मी सांगू इच्छिते की कोणत्याही महिलेला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा किंवा नाराजी माझ्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तुमचे खूप आभार.. मला आशा आहे की यापुढेही अशीच खेळीमेळीची चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण सुरू राहील.'

पुढे त्या म्हणाल्या, ' मी माझ्या परीने केवळ स्त्रियांनाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला पाठिंबा द्यायचा प्रयत्न करत आहे. जर आपण स्त्रिया सर्वसमावेशक आणि एकमेकांप्रती सहानुभूतीपूर्ण असू तरच आपण विचारांनी सशक्त आणि आनंदी समाज निर्माण करू शकू.'


'नकळतपणे मी कोणाचं मन दुखावलं असेन तर मी त्यांची मनापासून माफी मागते. ब्रेकिंग न्यूज किंवा हेडलाईन्समधून दिखावा करणं हे मला कधीच पटत नाही आणि मी तशी व्यक्ती नाही. मी प्रचंड आशावादी आहे आणि आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही दाखवलेल्या संयम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप आभार. या घटनेतून मला खूप काही शिकायला मिळालं आहे.' अशा शब्दात सोनाली व्यक्त झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

Buldhana Accident: मंगरूळ नवघरे येथे काळी पिवळी आणि दुचाकीची भीषण धडक; ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Breaking: लागा तयारीला... BCCI ने जाहीर केली IPL 2026 च्या तारखा; फ्रँचायझींना ई-मेल अन्...

Kolhapur Young Footballers Meet Messi : वानखेडेवर ‘लय भारी’ क्षण; मेस्सीने खेळवले, टिप्स दिल्या आणि कोल्हापूरकरांचा अभिमान वाढवला

Municipal Corporation Election : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT