Sonali Kulkarni Mexico Adventure funny video viral Instagram
मनोरंजन

मेक्सिकोत Adventure अनुभव घेताना सोनालीची Jump चुकली अन्...

सोनाली कुलकर्णी सध्या नवऱ्यासोबत मेक्सिकोमध्ये हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी गेली आहे.

प्रणाली मोरे

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(Sonali Kulkarni) सध्या आपल्या पहिल्या-वहिल्या नवऱ्यासोबत दुसरं लग्न करुन तिसऱ्या हनिमूनसाठी मेक्सिकोला(Mexico) गेलीय. आता हे आम्ही नाही,बाईंनीच सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी प्रमोट केलं होतं. म्हणजे नवऱ्यासोबतचं लग्न आणि हे स्पेशल हनिमून हॉलिडे प्लॅन तिनं खूप हटके अंदाजात चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. सध्या करिबियनच्या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेतानाचे भन्नाट फोटो-व्हिडीओ शेअर करण्याचा सोनालीनं नुसता सपाटा लावला होता.

अर्थात तिच्या पहिल्या नवऱ्यासोबतच्या दुसऱ्या लग्नाच्या फोटोंना आणि तिसऱ्या हनिमूनच्या फोटोंनादेखील चाहत्यांनी भरपूर लाईक्स दिले. पण आता सोनालीच्या मेक्सिको हनिमून हॉलिडेची एक बातमी कानावर पडतेय ज्यामुळं तिच्या चाहत्यांचा जीव थोडा घाबरा-घुबरा झालाय. नाही,फार घाबरु नका,आपली लाडकी अभिनेत्री थोडं साहसी अनुभव घेताना चुकीची उडी माऱल्यानं आपटली आहे,पण पाण्यावर. पण तिथेही आपटलं की लागतंच बरं का. म्हणजे जेव्हा चुकीची उडी आपण पाण्यात मारतो तेव्हा. सोनालीचंही हा साहसी अनुभव घेताना असंच काहीसं झालं अन् पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला...चला जाणून घेऊया सविस्तर.

सोनाली कुलकर्णी सध्या मेक्सिकोत पती कुणालसोबत कॅनकुन सिटीत एन्ज़ॉय करत आहे. कॅनकुनला करिबियनचा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. तिथं 'सिनोट' म्हणजे नैसर्गिक स्विमिंगपूल किंवा विहीर म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, तर यामध्ये पोहोण्याचा आनंद काही औरच. इथं लाइमस्टोनपासनं बनलेल्या या विहीरी किंवा स्विमिंग पूल म्हणजे निसर्गाचा एक दैवी चमत्कार. उंचावरनं जम्प मारत पाण्यात पोहोण्याचा भन्नाट साहसी एक्सपीरियन्स घ्यावा असाच. सोनालीनं देखील इथे तो अनुभव घाबरत घाबरत का होईना पण घेतला.

पण एक चूक तिनं केली. पाण्यात जम्प मारायला ती ट्रेनरनं सांगून सुद्धा चुकली अन् दणकन पाण्यावर आपटली. आता ही चुकीची उडी पाहताना तिथे उपस्थित असणाऱ्यांचा काळजाचा ठोका मात्र चुकला. पण पुन्हा परफेक्ट उडी ट्राय करुन योग्य प्रकारे साहसी अनुभव घेणार नाही तर ती सोनाली कुठली. तिनं पुन्हा एवढ्या उंचावरुन ती परफेक्ट जम्प मारली अन् 'करुन दाखवलं' चा आनंद सोशल मीडियावर शेअर केला. सोनालीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आम्ही बातमीत तो जोडला आहे. नक्की पहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT