sonali patil marathi actress meet nana patekar at airport and share experience and video viral SAKAL
मनोरंजन

Nana Patekar: "मी मराठी इंडस्ट्रीत काम करते म्हटल्यावर त्यांनी..." अभिनेत्रीला एअरपोर्टवर भेटले नाना, मग पुढे...

मराठी अभिनेत्रीला नाना पाटेकर एअरपोर्टवर भेटले मग पुढे काय झालं बघा

Devendra Jadhav

नाना पाटेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते. नाना पाटेकरांना भेटणं हा प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. असाच अनुभव एका मराठमोळ्या अभिनेत्रीला आला. ही अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील.

सोनालीने नाना पाटेकरांसोबतचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत सोनाली नाना पाटेकरांसोबत एअरपोर्टवर चालत आहे. हा व्हिडीओ शेअर करत सोनाली लिहीले, "इंडस्ट्रीत आले तेव्हा ठरवलं होतं या "माणसाला" भेटायचं.. तसं आम्हा सगळ्याच कलाकारांना आमच्यापेक्षा वयाने, कामाने आणि अनुभवांनी मोठ्या असलेल्या लोकांना भेटायचं असतं पण, तुम्हाला भेटायचं एक वेगळे वेगळं कारण माझ्याकडे होतं आणि ते म्हणजे "स्पोर्ट्स इंडस्ट्री" आणि "मराठी इंडस्ट्री" मध्ये आपण दोघेही काम करतो........

(sonali patil marathi actress meet nana patekar at airport)

सोनाली पुढे लिहीते, "मलाही 10 मीटर एअर पिस्तूल शूटिंग करायला आवडतं आणि टेलिव्हिजन वरचं म्हणजे नॉर्मल शूटिंग करायलाही आवडतं.......... तुमचंही अगदी तसंच आहे, तुम्हालाही पिस्तूल शूटिंग करायला आवडतं आणि इंडस्ट्रीमध्ये तर शूटिंगबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल "क्या कहने" आणि हेच जेव्हा तुम्ही भेटाल तेव्हा सांगायचं होतं की सर, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक गोष्ट "कॉमन "आहे आणि ती म्हणजे तुम्हालाही पिस्टल शूटिंग आवडतं, रेंजवरती जायला आवडतं आणि नॉर्मल स्क्रीन शूटिंग नॉर्मल शूटिंगही आवडतं......................................"

सोनाली पुढे लिहीते, "माझेही तसेच तुमच्यासारखंच आहे बरं का? मी ही 10 मीटर एअर पिस्टन ऑल इंडिया वुमन चॅम्पियनशिप, अमृतसर खेळले आहे पण बोलायचं तेवढं धाडस झालं नाही. धाडस म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या त्यामधून ही गोष्ट बोलायचेच राहून गेले कारण एकाच फ्लाईट मध्ये आम्ही प्रवास करत होतो."

सोनाली शेवटी लिहीते, "आणि प्रवासातून जसं फ्लाईट मधून खाली उतरलो तसं अगदी लहान मुलं पाठलाग करत जातात तसं मी तुमचा पाठलाग करत आले. तुमच्याशी बोलले पण तुमच्यातला इतका साधेपणा की मी मराठी इंडस्ट्री मध्ये काम करते टेलिव्हिजनला काम करते म्हटल्यावर अगदी कौतुकाने तुम्ही माझ्याकडे बघितलं.

माझ्याबरोबर मेघाताई होती ,तिच्याशी तुम्ही छान बोललात .......... फोटो घेऊ का? जर तुम्हाला वेळ असेल तर नाहीतर तुम्हाला त्रास नाही देणार .........यावर ते हसून "हो अगदीच"........ असं म्हणून तुम्ही न थकता कुठलाही चेहऱ्यावरती भाव न आणता अगदी हसत मुखाने फोटो दिलात. ऑल द बेस्ट केलेत. खूप मोठा आणि छान गेला तो दिवस अगदी अविस्मरणीय..........

अशाप्रकारे सोनालीने नाना पाटेकरांसोबत भेटायचा अनुभव शेअर केलाय.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT