Sonali Patil Google
मनोरंजन

पहा 'बिग बॉस 3' च्या सोनाली पाटीलची अतरंगी व्हिडीओ रील...

सोशल मीडियावरनं थेट आपल्या बॉयफ्रेंडला घातलीय भन्नाट स्टाईलमध्ये साद...

प्रणाली मोरे

मराठीतला 'बिग बॉस सिझन 3' नुकताच संपला. यंदाचा 'बिग बॉस'चा विनर ठरला आहे विशाल निकम(Vishal Nikam). घरातल्या सतरा सदस्यांना नमवत एक एक पायरी पुढे सरकत,अखेरच्या टप्प्यावर जय दुधाणे सारख्या स्ट्रॉंग कंटेस्टंटला मागे टाकत विशालने बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरले आहे. सध्या सगळेच विशालचं अभिनंदन करीत आहेत. घरातल्या इतर स्पर्धकांनीही 'विशाल जिंकण्यासाठी पात्र होता' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण असं असलं तरी बिग बॉसच्या घरात जे घडलं,जी भांडणं झाली,जे एकमेकांना नमवण्याचे गेम प्लान झाले आणि ते करताना जे खटके उडाले हे घराबाहेर आल्यावर संपले असं सगळे म्हणत असले तरी हळूहळू आता सगळेच एकमेकांच्या निगेटिव्ह बाजू नकळत कुठे ना कुठे मांडतानाही दिसत आहेत,हे नाकारून नक्कीच चालणार नाही.

बिग बॉसच्या घरात A आणि B असे दोन ग्रुप होते. B ग्रुपचा विशाल विजेता ठरलाय. याच ग्रुपमध्ये सोनाली पाटीलही(Sonali Patil) होती. सोनाली आणि विशालची सुरुवातीला मैत्री होती,मग चांगली मैत्री झाली आणि नंतर मैत्रीच्या पुढे दोघं एक पाऊल गेले आहेत असंही बोललं जाऊ लागलं. अर्थात बाहेर आल्यावर दोघांनी हे सगळं नाकारलं असलं तरीही का कुणास ठाऊक सोनालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ रील टाकली,जी तिने विशालला उद्देशून पोस्ट केलीय असे उगाच संदर्भ जोडले जाऊ लागले आणि लगोलग तो व्हिडीओ व्हायरल झाला

सोनालीची ही व्हिडीओ रील नक्की पहा. त्यात तिनं स्पष्ट केलंय की ती कुणाला सेल्फिश म्हणतेय.

सोनाली पाटीलला स्टार प्रवाह वाहिनीवरील 'वैजू नंबर वन' मालिकेतनं प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर 'देवमाणूस' झी मराठीवरील मालिकेमुळे ती महाराष्ट्रातल्या अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. पुढे लगेचच त्यामुळे बिग बॉसच्या घरात तिला आधीपासनंच ओळखत असल्यामुळे प्रेक्षकांनी शेवटपर्यंत तिला साथ दिली. अखेरच्या क्षणाला मात्र गेम फिरला आणि ती घरातनं आऊट झाली. घरात विशाल निकमशी सुरुवातीला तिचं असलेलं सुदर नातं शेवटी शेवटी थोडं बिघडलं. पण आता त्यांच्यात सगळं आलबेल आहे असं तिनं आणि विशालनं स्पष्ट केलंय. त्यामुळे ही रील विशालशी संबिधित नाही. तर या व्हिडीओत सोनाली 'सेल्फिश' आपल्या बॉयफ्रेडला म्हणालीय. जो अद्याप अस्तित्वात नाही,म्हणजे तिला भेटेलेला नाही. हे एक ट्रेंडिग गाणं आहे,ज्याची व्हिडीओ रील सोनालीनं पोस्ट केली आहे. सोनालीनं या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,नेक्स्ट रील कोणत्या गाण्यावर बघायला तुम्हालाआवडेल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT