Sonam Kapoor Sends Legal Notice To YouTuber esakal
मनोरंजन

Sonam Kapoor : अभिनेत्री अन् तिच्या पतीनं 'युट्युबर' ला शिकवला धडा, पाठवली कायदेशीर नोटीस, काय आहे कारण?

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर ही आता इंटरनॅशनल सेलिब्रेटी झाली आहे.

युगंधर ताजणे

Sonam Kapoor Sends Legal Notice To YouTuber :

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर ही आता इंटरनॅशनल सेलिब्रेटी झाली आहे. तिनं वेगवेगळ्या इंटरनॅशनल महोत्सवांमध्ये हजेरी लावली असून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. आता सोनम अन् तिचा पती आनंद आहुजा हे एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे.

बॉलीवूड सेलिब्रेटींनी रोस्ट करणं, त्यांच्यावर टीका करणं, त्यांना ट्रोल करणे हे सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांचा आवडीचा उद्योग आहे. यात काही युट्युबर देखील सहभागी होत असल्याचे दिसून आले आहे. एका युटयुबरनं सोनम कपूर आणि तिचा पती यांच्यावर टीका केल्यानं आणि त्यांच्याबद्दल अवमानकारक कंटेट प्रसारित केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते.

Also Read - Financial Planning: कसे सुधारायचे आपले आर्थिक आरोग्य....

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी देखील आपल्या परवानगी शिवाय कुणी त्यांचा फोटो, आवाज, आणि व्हिडिओ याचा वापर करत असेल तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता सोनम आणि आनंद हे देखील संबंधित युट्युबरच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. फ्री प्रेसनं दिलेल्या एका वृत्तानुसार सोनम आणि आनंद यांनी रागिनी नावाच्या युट्युबरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

त्या युट्युबरनं देखील त्या नोटीशीचा स्क्रिन शॉट सोशल मीडियावर शेयर केला आहे. काही दिवसांपूर्वी सोनमनं एका विषयावर वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ घेत युट्युबरनं सोनम अन् आनंदला ट्रोल केले होते. यावरुन सोनम आणि आनंदनं आक्रमक होत संबंधित युट्युबरला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Sonam kapoor anand ahuja

रागिनी यांनी एक व्हिडिओ शेयर केला असून त्यात त्यांनी त्या नोटिशीचा स्क्रिन शॉट देखील आहे. ट्रोलिंग झाल्यामुळे सेलिब्रेटींनी त्या युट्युबरच्या विरोधात आक्रमक पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर या बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

सोनमच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिनं शोम मखिजा यांच्या ब्लाईंड नावाच्या चित्रपटामध्ये दमदार परफॉर्मन्स दिला आहे. यानंतर सोनमनं काही वेळ ब्रेक घेण्याचा विचार केला असून पुढील काही दिवसांत ती पुन्हा अॅक्टिव्ह होणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT