Sonam Kapoor King Charles Coronation Speech Video Esakal
मनोरंजन

Sonam Kapoor: 'आपण बोलतोय कुठे', किंग चार्ल्सच्या कॉन्सर्टमध्ये जोरदार भाषण ठोकूनही सोनम झाली ट्रोल

Vaishali Patil

Sonam Kapoor King Charles Coronation Speech Video: बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. सोनमचे चित्रपट जरी इतके फारसे चालले नाहीत पण तिच्या फॅशन स्टाइलमुळे ती नेहमीच तिच्या चर्चेत असते. काही दिवसांपासून ती लंडनचा राजा चार्ल्स 3 यांच्या राज्याभिषेकामुळे चर्चेत आहे.

राजा चार्ल्स यांचा राज्याभिषेक ६ मे रोजी झाला. त्यानंतर ७ मे रोजी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक देशांतील मोठमोठे व्यक्तींनी सहभाग घेतला होता. त्याच कार्यक्रमाचा सोनम कपूर देखील या कार्यक्रमाचा एक भाग होती.

डिझायनर एमिलिया विकस्टेड यांनी डिझाइन केलेल्या बेस्पोक फ्लोअर-लेंथ गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. ज्यासाठी त्याला खूप प्रशंसा मिळाली. सोनमने या कार्यक्रमात उत्तमरित्या भाषणही केले. सोनम कपूरने आपल्या भाषणाची सुरुवात 'नमस्ते'ने केली. तिथेच तिने अनेकांची मने जिंकली. ही खुप अभिमानाची बाब आहे असं सांगत अनेकांनी तिचं कौतुक केल.

मात्र, काहींनी तिच्या भाषणावरून ट्रोल करायला सुरवात केली आहे. नेटिझन्स सोनम कपूरला तिच्या बोलण्यावरून खूप ट्रोल करत आहेत.

या भाषणात सोनम कपूर म्हणाली, 'आपलं कॉमनवेल्थ एक महासंघ आहे. एकत्रितपणे आपण जगातील एक तृतीयांश लोक आहोत. जगाच्या एक चतुर्थांश भूभाग आहे. आपला प्रत्येक देश अद्वितीय आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण खास आहे. एक समृद्ध भविष्य घडवण्याचा आमचा निर्धार आहे, जिथे प्रत्येक आवाज ऐकू येईल."

सोनमच्या या व्हिडिओची खिल्ली उडवली जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना एका नेटिझन्सने लिहिले की, “हे लज्जास्पद आहे. कार्यक्रमाला जायचं असते तर तिने चांगली तयारी करायला हवी होती. ती इंग्रजी भाषण स्पर्धेत भाग घेतलेल्या पाचव्या वर्गातील बालकाप्रमाणे बोलत आहे. तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, ही जागतिक मंच आहे. तिथे तरी नीट बोलली असती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT