Sonam Kapoor has become a ‘mother’? Photo of baby in lap on hospital bed goes viral Google
मनोरंजन

Viral Photo: हॉस्पिटलमध्ये सोनमच्या कुशीत चिमुकलं बाळ, अभिनेत्री आई बनली?

सोनम कपूरने सौशल मीडियावर आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा मार्च २०२२ मध्ये केली होती.

प्रणाली मोरे

अनिल कपूर (Anil Kapoor) यांची मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर(Sonam Kapoor) प्रेग्नेंट(Pregnant) आहे आणि लवकरच आपल्या पहिल्या अपत्याला जन्म देणार आहे हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. त्यात सोनम आणि पती आनंद अहूजा हे जोडपं सध्याच्या पॉप्युलर जोडप्यांपैकी एक. त्यामुळे यांच्या बाबतीतील अपडेट्स सर्वांनाच जाणून घेण्यात इंट्रेस्ट असतोच. त्यात अचानक बातमी समोर आली आहे की सोनम आणि आनंद आपल्या बाळाच्या जन्माचा आनंद घेतायत. हॉस्पिटलच्या बेडवर सोनमनं आपल्या बाळाला छातीशी बिलगून धरलं आहे. अर्थात हा एक फोटो सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. कुठलीही कानोकान खबर न देता सोनमनं बाळाला जन्म दिला देखील या चर्चेला उधाण आलं आहे. हे कसं शक्य आहे? पण हा व्हायरल फोटो मात्र हेच सांगताना दिसत आहे.(Sonam Kapoor has become a ‘mother’? Photo of baby in lap on hospital bed goes viral)

व्हायरल फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण सोनमनं छातीशी घट्ट बिलगून धरललेल्या बाळाचा फोटो खूपच रिअल वाटत आहे. पण आता जरा या व्हायरल फोटोमागचं सत्य जाणून घेऊया.

त्या फोटोत सोनम हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली आहे आणि सोनमनं छातीशी एका बाळाला बिलगून धरलं आहे. एका फोटोत सोनम कॅमेऱ्याकडे पहात आहे आणि दुसऱ्या फोटोत सोनम लहान बाळाकडे टक लावून पाहत आहे. पण सोनम सोबतच्या या बाळाचा असलेला फोटो खरा नाही बरं का. आणि सोनम कपूरनं अद्याप आपल्या बाळाला जन्म दिलेला नाही. सोनमचा हा फोटो एडिट केलेला आहे आणि दुसऱ्या फोटोला जोडलेला आहे. या फोटोत काहीच तथ्य नाही.

Sonam Kapoor has become a ‘mother’? Photo of baby in lap on hospital bed goes viral

सोनमने आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा मार्च २०२२ मध्ये केली होती. त्यानंतर सोनम नेहमीच आपलं बेबी बंप आणि प्रेग्नेंसी ग्लो दाखवणारे फोटो शूट करत सोशल मीडियावर ते पोस्ट करताना दिसली. नुकताच तिचा डोहाळे जेवणाचा सोहळा देखील साजरा करण्यात आला. ज्यातील फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता ती तिच्या प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत सांगितलं होतं की,ती आपला पती आनंद अहूजाला मिस करतेय. तिनं लिहिलं होतं-''माझ्या आवडत्या माणसाची मला खूप आठवण येतेय''.

सोनमच्या या फोटोवर पती आनंद अहूजानं कमेंट करत लिहिलं होतं की,''तू सर्वात क्यूट आहेस''. सोनमच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर,सध्या प्रेग्नेंसीमुळे तिनं सिनेमांतून ब्रेक घेतला आहे. तिच्याकडे सध्या 'ब्लाइंड' सिनेमा आहे. ज्यामध्ये ती पूरब कोहली,विनय पाठक आणि लिलेट दुबे यांच्यासोबत दिसेल. बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी सोनम कपूर या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: प्रकाश आंबेडकर, वामन मेश्राम, पुरुषोत्तम खेडेकर टार्गेटवर; प्रवीण गायकवाड यांचा धक्कादायक आरोप

Income Tax: 24 तासांत मिळतोय ITR रिफंड, आजच फाईल करा... उद्या बँक खात्यात पैसे जमा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Beed : ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलं विषप्राशन, बेशुद्धावस्थेत नेलं रुग्णालयात; १८ महिन्यांपासून पतीचे मारेकरी मोकाट, अटकेची मागणी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्राच्या जलवाहतूक क्षमतेचा वापर करून राज्याला आणि देशाला सागरी महाशक्ती बनवण्याच्या दिशेने मोठं पाऊल- देवेंद्र फडणवीस

स्वतः इंग्लिश मीडियममध्ये शिकला, ख्रिश्चन बायको केली आणि आता... बिग बॉस फेम रीलस्टारची रितेश देशमुखवर टीका

SCROLL FOR NEXT