Sonam Kapoor On Karva chauth, actress trolled Instagram
मनोरंजन

Sonam Kapoor: 'करवा चौथ व्रत करण्यापेक्षा...', सोनम कपूर स्पष्टच बोलली

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. आता करवा चौथ व्रता संदर्भातील तिच्या पोस्टमुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

प्रणाली मोरे

Sonam Kapoor On Karva Chauth: बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. सोनमचं सिने-करिअर भले फारसं काही चांगलं राहिलं नाही पण तिच्या फॅशन स्टाइलमुळे ती नेहमीच बातम्यांच्या हेडलाईनमध्ये राहिली. सध्या सोनम करवा चौथ व्रता संदर्भातील तिच्या विधानामुळे चर्चेत आहे. सोनमच्या लग्नाला चार वर्ष झाली आहेत. पण तिनं आतापर्यंत कधीच करवा चौथ हे व्रत केलं नाही. आणि नुकतंच तिनं यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे. सोनम म्हणाली की तिचा पती आनंद आहूजामुळे ती हे व्रत करत नाही.(Sonam Kapoor On Karva chauth, actress trolled)

सोनम कपूरनं साडीमध्ये आपले काही फोटो करवा चौथच्या दिवशी शेअर केले होते. या फोटोंना कॅप्शन देत सोनमनं लिहिलं की, ''माझे पती आनंद आहूजा करवा चौथच्या व्रताला मानत नाही. कारण त्यांना वाटतं की त्या व्रतासाठी स्त्रिया कडक उपवास ठेवतात त्यापेक्षा त्यांनी इंटरमिंटेंट डाएट(ठरलेल्या वेळेत थोडं-थोडं खाणे) करुन स्वतःची प्रकृती उत्तम ठेवायला हवी. त्यामुळे मी हे व्रत ठेवत नाही. पण आमच्या दोघांचा आपले सण-परंपरा यांवर विश्वास आहे. कारण या गोष्टी कुटंबाला एकत्र बांधून ठेवतात. मला खूप चांगलं वाटतं जेव्हा माझी आई खूप प्रेमाने-हौशेने हा सण साजरा करते. आणि मी जरी हे व्रत करत नसले तरी त्या परंपरेचा भाग मात्र मी नक्कीच बनते''. असं स्पष्ट मत व्यक्त करत सोनमने आपल्या चाहत्यांना करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या.

सोनम कपूरच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या पहायला मिळाल्या. एकीकडे जिथे हिंदू धर्माच्या परंपरेचा भाग न बनण्यावर सोनमला ट्रोल केलं गेलं,तिकडे दुसरीकडे काही चाहत्यांनी सोनमच्या या विचारांचं समर्थन केलं. सोनमनं बाळाला जन्म दिल्यानंतर इतकं पटकन वजन कसं कंट्रोल केलं याविषयी देखील चाहत्यांनी तिचं कौतूक करत तिला त्यावर सल्लाही देण्यास सांगितला आहे. सोशल मीडियावर सोनमचे हे फोटो भलतेच व्हायरल झाले आहेत.

सोनम कपूरनं आनंद आहूजासोबत २०१८ मध्ये लग्न केलं होतं. सोनमच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते. अनेक सेलिब्रिटींनी तिच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती. अनिल कपूर यांनी तेव्हा मीडियाचा देखील पाहुणचार चांगला केला होता ज्याचं खूप कौतूकही झालं होतं. २० ऑगस्ट,२०२२ रोजी सोनमनं आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. सोनम आणि आनंद आहुजा यांच्या मुलाचं नाव वायु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'

Shehzad Poonawalla Resignation : पंतप्रधान मोदींचे कट्टर समर्थक शहजाद पूनावाला यांचा भाजपचा राजीनामा; राष्ट्रीय प्रवक्त्याने पक्ष का सोडला?

Bhiwandi Building Collapse: आम्ही बाहेर पडलो, पण आमची लेक ढिगाऱ्याखालीच अडकली अन्..., भिवंडी दुर्घटनेतील पीडितांनी सांगितला थरार!

Latest Marathi News Live Update : चाकण-शिक्रापूर मार्गावर कंटेनर बंद पडण्याचे प्रकार वाढले; वाहतूक पूर्णपणे जाम

Nagpur Accident News: भीषण अपघातात मायलेकाचा मृत्यू; नवरगाव शिवारातील घटना; मद्यधुंद चालक अटकेत

SCROLL FOR NEXT