Sonam Kapoor with Husband Anand Ahuja,maother in law and father in law Harish Ahuja.
Sonam Kapoor with Husband Anand Ahuja,maother in law and father in law Harish Ahuja. Instagram
मनोरंजन

सोनम कपूरच्या सासऱ्यांसोबत सायबर क्राइम; तब्बल २७ कोटींचा लागला गंडा

प्रणाली मोरे

सोनम कपूरचे(Sonam Kapoor) सासरे हरिश अहुजा(Harish Ahuja) यांना तब्बल २७ कोटी रुपयांचा गंडा लावला गेला आहे. फरिदाबाद पोलिसांनी याप्रकरणात तातडीनं पावलं उचलत सायबर गुन्हेगारांच्या(Cyber Criminals) टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीनं म्हणे हरीश अहुजा याच्या 'शाही एक्सपोर्ट' या आयात-निर्यात व्यापारात असणाऱ्या कंपनीची फसवणूक केलीय. गेल्या वर्षी जुलै महिन्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. तेव्हापासनं फरिदाबाद पोलिसांची टीम या केसवर काम करत होती. या केसमध्ये दिल्ली,मुंबई,चेन्नई आणि कर्नाटकमधनं नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यात कोण कोण सामिल आहे हे ऐकाल तर तोंडात बोटं न घालाल तर नवलच. या आरोपींमध्ये माजी लिपिक आणि परदेशी व्यापार महासंचालनालयाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चौकशीपश्चात समजतंय की हे आरोपी डीजीएफटीच्या कामात एक्सपर्ट होते. मनोज राणा, ललित कुमार,मनीष कुमार,भुसम किशन ठाकूर,सुरेश कुमार जैन,गणेश परशुराम,प्रवीण कुमार,ललित कुमार जैन,मनीष कुमार भोगा,राहुल रघुनाथ,संतोष सीताराम या आरोपींना अटक करण्यात आलं आहे. हे प्रकरण नेमकं असं आहे की,सरकार एक्सपोर्ट बिझनेसमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना आरओएसटीएल परवान्याच्या माध्यमातनं उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कात काही सुट देते. हे परवाने लाखो रुपयांचा फायदा कंपनीला करुन देतात. फसवणूक करणाऱ्यांनी याचाच फायदा घेत आहूजा यांच्या कंपनीचे २७.६१ कोटी किमतीचे एकूण १५४ आरओएसटीएल लबाडींन खोट्या डिजिटल साइनच्या माध्यमातून प्राप्त केले आणि ते इतरांना विकले. अशी एकंदरीत ही फसवणूक झाल्याचं फरिदाबादचे पोलिस उपायुक्त(मुख्यालय) नितीश अग्रवनाल यांनी सांगितले.

सोनम कपूरनं हरिश अहुजा यांचा मुलगा आनंद अहुजाशी लग्न केलं. आनंद आणि सोनम लग्नाआधी काही वर्ष एकमेकांना डेट करीत होते. आनंद हा लंडनस्थित त्याचा बिझनेस सांभाळत असून त्याचा 'भाने' नावाचा फॅशन ब्रॅंड आहे. सोनम कपूर आणि तो दोघे लंडनमध्येच राहतात. आनंद आपल्या वडिलांच्या कंपनीत संचालक देखील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT