song from Marathi movie daah Prem he is released  
मनोरंजन

स्वप्निल-बेलाच्या सुंदर आवाजातलं 'प्रेम हे' गाणं ऐकलं का?

वृत्तसंस्था

कवी मंगेश  पाडगांवकर म्हणायचे, 'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं..' आणि खरच प्रेम म्हंटल की अगदी कोणत्याही वयाचा माणूस असू दे त्याचा चेहऱ्यावर नकळत हसू उमटत. फेब्रुवारी महिना म्हंटल की आपल्या सगळ्यांसमोर येतो तो 'Valentine's Day',अर्थात 'प्रेमाचा दिव'.

कोणाला त्यांचं पहिलं प्रेम आठवतं तर काही जण पुन्हा नव्याने आपल्या प्रियकराच्या प्रेमात पडतात. ह्याच दिवसाचं औचित्य साधून 'माणसांनी केवळ कुटुंबापुरतं न जगता देशासाठी आणि समाजासाठी काही तरी केलं पाहिजे', असा सुंदर विचार मांडणाऱ्या 'दाह एक मर्मस्पर्शी कथा' या सिनेमातील  स्वप्नील बांदोडकर आणि  बेला शेंडे ह्यांचा सुरेल आवाजातील 'प्रेम हे' रोमँटिक गाणं आज प्रदर्शित झाले आहे. मंदार चोळकर यांनी लिहिलं असून संगीतकार प्रफुल्ल स्वप्निल ह्यांनी ह्या गाण्याला संगीत दिले आहे. हे गाणं सायली संजीव आणि सुहृद वार्डेकर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

प्रेम म्हंटल की त्यात रुसवे – फुगवे, आपुलकी, जिव्हाळा या सर्व गोष्टी आपसूक आल्याच. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा प्रेमाची परिभाषा सांगणारं 'प्रेम हे' हे गीत हे अनेकांसाठी नक्कीच व्हॅलेंटाईन डे स्पेशल गिफ्ट ठरणार आहे.

माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या चित्रपटाची निर्मिती युगंधर क्रिएशन्सचे अनिकेत राजकुमार बडोले यांनी केली आहे. मल्हार गणेश यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे तर डॉ. सतीश (अतुल) सोनोने यांनी कथा लिहिली आहे. सायली संजीव, गिरीश ओक, राधिका विद्यासागर, सुह्रद वार्डेकर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौघुले यांच्या महत्वपूर्ण भूमिका असलेला 'दाह एक मर्मस्पर्शी कथा' येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT