sonu 
मनोरंजन

१६ वर्षांचा असताना सोनू निगमने गायलेलं 'हे' प्रसिद्ध गाणं होतंय व्हायरल, एकदा पाहाच..

सकाळवृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे सेलिब्रिटी घरात बसून सध्या वेळ घालवत आहेत. त्यातंच त्यांचे जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतायेत. गायक सोनू निगमचा एक जबरदस्त जुना व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडिओ सोनु निगमने स्वतः त्याच्या चाहत्यांसाठी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलाय. यात सोनु एक प्रसिद्ध गाणं गाताना दिसतोय.

सोनू निगमचा हा व्हायरल व्हिडिओ ३१ वर्ष जुना आहे.. केवळ १६ वर्षाचा असताना सोनू निगमने त्याच्या जादूई आवाजाने प्रेक्षकांना आकर्षित केलं होतं.. या व्हिडिओविषयी सांगायचं झालं तर हा व्हिडिओ १९८९ सालचा आहे. यामध्ये सोनू नटराज पुरस्कार समारंभात महाभारतचं टायटल साँग गात आहेत. १६ वर्षाच्या सोनू निगमला महाभारतचं हे टायटल साँग गाताना पाहून कोणीही प्रभावित होईल इतका त्याच्या आवाज गोड आणि कणखर आहे.

हा व्हिडओ शेअर करत सोनू निगमने लिहिलंय, 'तालकटोरा इंदौर स्टेडियममधील नटराज पुरस्कार सोहळ्यात गायलेला हा जुना व्हिडिओ. जिथे मी महाभारतचं गाणं गायलं होतं. ते गाणं मी पूर्णपणे आठवून ठेवलं होतं. त्यावेळी आमच्याकडे युट्युब सारखा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नव्हता.' 

सोनू निगमविषयी सांगायचं झालं तर त्याच्या गाण्यासोबतंच तो काही दिवसांपासून त्याने केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. कोरोना व्हायरसमुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे सोनू निगम सध्या दुबईमध्ये अडकला आहे. त्याने स्वतः याविषयी माहिती दिली होती.

त्याने असं म्हटलं होतं की, जर तो भारतात आला तर तो त्याच्या कुटुंबाला आणि वडिलांना संकटात टाकेल. त्यामुळे सध्या तरी तो भारतात येण्याविषयी विचार करत नाहीये. 

sonu nigam 31 years old video goes viral singing mahabharta title song at the age  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT