Sonu Nigam Bollywood Singer Controversy  esakal
मनोरंजन

Sonu Nigam : 'मशिदीवरील भोंग्यावर बोलणं ते...' सोनू निगमचे 4 वाद ज्यामुळे नेहमीच राहिला चर्चेत

बॉलीवूडचा लाडका लोकप्रिय गायक सोनू निगमला चेंबुरमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान झालेली धक्काबुक्की चर्चेत आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sonu Nigam Bollywood Singer Controversy Mumbai Chembur : बॉलीवूडचा लाडका लोकप्रिय गायक सोनू निगमला चेंबुरमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान झालेली धक्काबुक्की चर्चेत आली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोनूनं आता उद्धव ठाकरे गटाचे आमदार फातर्पेकर यांच्या मुलाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारही दिली आहे.

दुसरीकडे नेटकऱ्यांनी सोनूला नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे. त्याच्या वादामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला असून उद्दामपणा करणे, चाहत्यांना बोलणे असे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहे. बऱ्याचदा सोनू हा चाहत्यांना फोटो देत नाही. त्यांच्यासोबत गैरव्यवहार करतो अशी तक्रार नेटकऱ्यांची असते. यासगळ्यात सोशल मीडियामध्ये सोनू निगमविषयीचे चार वाद व्हायरल झाले आहेत.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्या चार वादांमुळे सोनू हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. मशिदीवरील भोंग्यानं माझी झोप खराब होते. एवढी धार्मिक कट्टरता काय कामाची. हे असं करणं म्हणजे गुंडगिरी आहे. असं ट्विट सोनुनं केलं होतं. त्यामुळे तो चर्चेत आला होता. सोशल मीडियावर सोनुच्या अशा भूमिकेनं तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अनेकांनी त्याला ट्रोल केले होते. याशिवाय त्याचा जेट एयरवेजमधील वादही गाजला होता.

त्या वादानं नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानं फ्लाईटमध्ये गाणं गायलं होतं. त्यानं अनाउसमेंट प्रणालीचा वापर करत गाणं गायलं होतं. त्यामुळे तो वादात अडकला. त्याच्या या कृतीमुळे एका क्रु मेंबर्सला आपली नोकरी गमवावी लागली होती. सोनू निगमवर त्यावेळी प्रचंड प्रमाणात टीका झाली होती. दुसरीकडे राधे मा चे समर्थन केल्याप्रकरणी देखील तो चर्चेत आला होता. त्यानं तिची तुलना काली मा शी केली होती. नेटकऱ्यांना त्याची हे वक्तव्य आवडले नव्हते.

यानंतर सोनू निगम हा टी सीरिजच्या वादात अडकला होता. यावेळी त्यानं काही धक्कादायक खुलासे केले होते. दिव्या खोसला कुमार यांच्यासोबत एका वेगळ्या वादात सोनू निगम अडकला होता. भुषण कुमार हे गायकांना त्रास देत असल्याची तक्रार सोनूनं केली होती. टीसीरिजचे प्रमुख म्हणून ते मनमानी करत असल्याचे सोनूनं म्हटले होते.

मुंबईतील चेंबुरमधील घटनेनंतर सोनू निगम हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे वाद पुन्हा व्हायरल होत आहे. आपल्या परखड वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोनुला नेटकऱ्यांच्या रागाला सामोरं जावं लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT