sonu nigam facebook
मनोरंजन

कुंभमेळ्याच्या आयोजनावरुन सोनू निगमचं मोठं विधान

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत मांडलं मत

स्वाती वेमूल

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बुधवारी हजारो साधूंनी हरिद्वारमधील हर की पैरी इथं गंगा नदीत कुंभमेळ्यातील तिसरं शाहीस्नान केलं. कोरोनासंबंधित नियमांची पायमल्ली करून दुसऱ्या शाहीस्नानालाही साधूंसह भाविकांनी गर्दी केली होती. प्रसिद्ध गायक सोनू निगमने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत कुंभमेळ्याचं आयोजन व्हायला पाहिजे नव्हतं, असं मत व्यक्त केलं. यावेळी बहिणीच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली असून ते आयसीयूत दाखल असल्याची माहिती त्याने दिली.

"कुंभमेळ्याचं आयोजन व्हायला पाहिजे नव्हतं"

"एक हिंदू म्हणून मला वाटतं की कुंभमेळ्याचं आयोजन व्हायला पाहिजे नव्हतं. सुदैवाने आता कुंभमेळ्यात प्रतीकात्मक सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हा लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे, मात्र सध्या जगभरात लोकांच्या प्राणाशिवाय अधिक काहीच महत्त्वाचं नाही. सध्याच्या परिस्थितीत कोणतेही शोज झाले नाही पाहिजेत आणि आयोजित केल्यास त्यात कडक नियम पाळण्यात यावेत", असं सोनू या व्हिडीओत म्हणाला. सोनू निगम सध्या गोव्यात असून १९ एप्रिल रोजी मुंबईला परतणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत आल्यानंतर सोनू काही दिवस क्वारंटाइनमध्ये राहणार आहे.

कुंभमेळ्यात प्रतीकात्मक सहभागी होण्याचं मोदींचं आवाहन

कोरोना संकटामुळे हरिद्वार इथल्या कुंभमेळ्यातील सहभाग प्रतिकात्मक ठेवण्यात यावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. असं केल्यामुळे कोरोना विरोधातील लढ्यास मोठी शक्ती मिळेल, असं मोदी यांनी ट्विट करत म्हटलं. मोदी यांच्या दूरध्वनीनंतर जुना आखाड्याचे स्वामी अवधेशानंद गिरी यांनी लोकांना मोठ्या संख्येने कुंभमेळ्यात स्नानासाठी न येण्याचं आवाहन केलं. स्वत:चे आणि इतरांचे प्राण वाचवणे ही पवित्र गोष्ट आहे असंही अवधेशानंद यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा नवा फॉर्म्युला! 25 नाही तर तब्बल 'इतक्या' जागांसाठी होणार चुरस, काय आहे गणित?

IND vs WI: भारताविरुद्धच्या T20-वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर; धाकड खेळाडूची झाली दमदार वापसी, पहा संपूर्ण संघ

Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी रेल्वे प्रशासन सज्ज! मध्य रेल्वेसह हार्बरवर २२ विशेष लोकलची घोषणा; कधी कोणती धावणार?

बोलता-बोलता सलमान खानच्या छातीत उठल्या तीव्र कळा ; पाणी मागितलं, डॉक्टरांना बोलवण्यास सांगितलं, बिग बॉसच्या घरातील Viral Video

Kashedi Tunnel : कशेडी बोगद्यातील दिवे बंद; 500 मीटर परिसरातील अंधाराने वाढवली चिंता, ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास अंधारात...

SCROLL FOR NEXT