sonu sood give funny reply on india china border tweet by user 
मनोरंजन

हा अभिनेता चीन सैन्यालाही बॉर्डरवरून पाठवणार घरी, त्याच्यावर सर्वत्र होत आहे कौतुकाचा वर्षाव

सकाळवृत्तसेवा

मुंबई : जगभरात करोना व्हायरसमुळे सर्वत्र चर्चा सुरू आहेच. त्यातच सोनू सूदच्या मदत कार्याबद्दलही  सगळीकडेच बोललं जात आहे. सोनू सूदच्या प्रत्येक कामावर देशभरातील लोकांच्या नजरा आहेत. त्याने करत असलेल्या मदतीबद्दलच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या देशभरात जेवढी करोना व्हायरसची चर्चा होते, तेवढीच चर्चा सोनू सूदचीही सुरू आहे. स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याचं काम सोनू सूद करत आहे.

सोनू सूदच्या या कामाची चर्चा आणि कौतुक जगभरात होत आहे. यावेळी चीनच्या सैन्याशी निगडीत एका युझरने ट्वीट केलं. भारत-चीन सीमेवर सध्या वातावरण खूपच गंभीर आहे. यावर एका युझरने लिहिलं की, 'माझा विचार आहे की, सोनू सूदला लडाखला पाठवलं पाहिजे, तो तिकडून चीनी सैन्याला त्यांच्या घरी सुरक्षित सोडून येईल.' या ट्वीटला उत्तर देताना सोनूने लिहिले की, 'मला चीनी सैन्यांचे डिटेल्स पाठवा.' सोनूचे हे ट्वीट खूपच व्हायरल होत आहे.

नुकतचं सोनू सूदने आसाममध्ये अडकलेल्या लोकांची मदत केली. एका युझरने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला होता. यात अनेक लोक मास्क लावून बसलेले दिसत आहेत. त्या व्हिडिओला शेअर करत युझरने लिहिले की, 'सोनू सर आम्ही आसामच्या गरिबाल्दी येथे आहोत. कृपा करून आम्हाला घरी सोडा.' या व्हिडिओला उत्तर देताना सोनूने लिहिले की, 'कृपा करून तिथे रहा.

तुमच्या सुरक्षेसाठी मी तिथे कोणालातरी पाठवतो. तुम्हाला नेण्यासाठी येतील आणि तुमच्या राहण्याची सोय करेल. अभिनेता सोनू सूद हा अनेक मोलमजुर तसेच आता चीन सैन्यालाही बॉर्डरवरून पाठवणार असून, तो खूप मोठं काम करत असल्याचं पाहावयास मिळत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT