actor sonu sood  team esakal
मनोरंजन

सोनू सूदची होणार राजकारणात एन्ट्री?

बॉलीवूड सेलिब्रेटींना राजकारणाचे काही वावड़े नाही.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता सोनू सूद (bollywood actor sonu sood) हा त्याच्या सामाजिक उपक्रम (social cause) आणि मदतशील स्वभावासाठी प्रसिध्द आहे. त्यानं कोरोनाच्या काळात अनेक लोकांना मदतीचा हात दिला आहे. बॉलीवूड सेलिब्रेटींना राजकारणाचे काही वावड़े नाही. यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांनी आपले फिल्म करिअर सोडून राजकारणाची वाट धरलेली दिसते. गेल्या काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे कलाकारांनी राजकारणात प्रवेश करण्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली होती. (sonu sood says he will announce his entry in politics from his roof top)

आता अभिनेता सोनू सूदच्या (sonu sood)राजकीय प्रवेशाची रंगली आहे. अर्थात या चर्चेला त्यानं फारसा अर्थ नसल्याचे सांगितले आहे. मात्र जेव्हा केव्हा राजकारणात येईल त्यावेळी मी सर्वांना ओरडून सांगितल्याशिवाय राहणार नाही. असंही त्यानं सांगितले आहे. त्यानं यासंबंधी एका वृत्तवाहिनीला यासंबंधी मुलाखत दिली होती. त्यात सोनुनं खुलासा केला होता.

सोनूच्या उदार स्वभावाचा परिचय त्याच्या चाहत्यांना आला आहे. कोरोनाच्या काळात त्यानं कोरोनाग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. त्यात त्यानं रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर, औषधे उपलब्ध करुन देणे यासारखी महत्वाची कामं केली होती. त्यामुळे त्याचा फॅन फॉलोअर्सही प्रचंड आहे. त्याला त्याचे चाहते नेहमी एक प्रश्न विचारतात. तो म्हणजे तु राजकारणात कधी येणार, यावर सोनुनं गंमतीशीर उत्तर दिलं आहे.

इटीव्ही भारतनं घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये सोनुनं सांगितलं, माझ्या फॅन्सला असे वाटते की मी लवकरच राजकारणात येणार आहे. मला असे वाटते राजकारण हे कमालीचे क्षेत्र आहे. त्यात खूप काही करण्यासारखेही आहे. मात्र मला त्यात यायला आणखी वेळ आहे. त्यामुळे सध्या जी चर्चा सुरु आहे त्याकडे फारसं लक्ष देऊ नये. दुसरं असं की, मला जेव्हा राजकारणात यायचं असेल तेव्हा मी ती गोष्ट सर्वांना ओरडून सांगितल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Weakening India : देशाच्या ७० ते ८० टक्के भागांत पावसाचे ढग दिसेनात; माॅन्सून कुठे गायब झाला ? हवामान विभागाची मोठी माहिती

Chhatrapati Sambhajinagar: पाच कोटी रोख, चार रायफल, दोन पिस्टल, सहा हजार काडतुसे! ; डाॅन बाबा फर्जनच्या घरात घबाड

Latest Marathi News Update : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ

Moshi Garbage Dump Accident : मेंदीचा रंग उतरण्याआधीच कुंकू पुसले; अक्षय सावंतच्या निधनाने पत्नीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अवघ्या दोन महिन्यांत संसाराची राखरांगोळी

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

SCROLL FOR NEXT