सा रे ग म प लिटिल चॅम्पचं नवं पर्व लवकरच

लवकरच साकार होणार लहान दोस्तांचं स्वप्न
सा रे ग म प लिटिल चॅम्पचं नवं पर्व लवकरच

एकेकाळी झी मराठीवर तुफान लोकप्रिय ठरलेला रिअॅलिटी शो म्हणजे सा रे ग म प लिटील चॅम्प. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नवोदित बालगायक उदयास आले. विशेष म्हणजे याच कार्यक्रमामुळे मराठी चित्रपटसृष्टीला आज मुग्धा वंशपायन, कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे असे सुमधूर गायक, गायिका लाभले आहेत. विशेष म्हणजे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा हा कार्यक्रम पुन्हा एकदा साऱ्यांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत आपल्या आवाजाने कानसेनांना तृप्त करणारे हे पंचरत्न पहिल्यांदाच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. (saregamapa-little-champs-singing-reality-show-new-season)

तब्बल १२ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. अलिकडेच त्याचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला होता. तेव्हापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागून राहिली आहे. विशेष म्हणजे या नव्या पर्वात आपले पंचरत्नदेखील झळकणार आहे. मात्र, यावेळी ते गायक किंवा स्पर्धक म्हणून नव्हे तर चक्क परिक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

सा रे ग म प लिटिल चॅम्पचं नवं पर्व लवकरच
वयात येणाऱ्या मुलींना 'या' गोष्टी चुकूनही सांगू नका!

दरम्यान, हे नवं पर्व येत्या २४ जूनपासून रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या पर्वात आर्या, मुग्धा, कार्तिकी, प्रथमेश आणि रोहित ज्युरी म्हणून काम पाहणार आहेत. तर, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सूत्रसंचालिकेची भूमिका पार पाडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com