sonu sood 
मनोरंजन

सोनू सुदचं रमजान गिफ्ट, रमजान महिन्यात 25 हजार गरजुंसाठी करणार जेवणाची सोय 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये मदत करणाऱ्या कलाकार मंडळींची यादी भली मोठी आहे. आर्थिक तसेच धान्य, जेवणाच्या स्वरूपात कलाकार गरजूंना मदत करत आहेत. काही कलाकारांनी तर चक्क त्यांचे हॉटेल्स, ऑफिस विलगीकरण कक्षासाठी देऊ केले आहेत. तर काहींनी पोलिस कर्मचाऱ्यांना ड्युटी दरम्यान आराम करता यावा म्हणून हॉटेल्सची सोय करून दिली आहे. कलाविश्वातून मदतीचा ओघ सुरु असताना अभिनेता सोनू सुदनेही एक कौतुकास्पद काम केलं आहे. सोनूने गरजूंना रमजान गिफ्ट दिलं आहे. सोनूने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन मदतीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. एकत्रित येऊन मदत करा असेही त्याने म्हटले आहे. 

रमजान महिन्यात जवळपास 25 हजार गरजूंना जेवण पुरवण्याचा निर्णय सोनूने घेतला आहे. याचबाबत सोनू म्हणतो, सध्या देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. एकमेकांना मदतीचा हात प्रत्येकाने पुढे करायला हवा. रमजान महिन्यात एकही गरजू उपाशी राहू नये म्हणून मी हा छोटासा प्रयत्न करत आहे. दिवसभर उपवास केल्यानंतर रात्रीचं जेवण व्यवस्थित मिळावं म्हणून आम्ही जेवण पुरवणार आहोत.`

भिवंडी येथे राहणाऱ्या 25 हजार गरजूंसाठी सोनूने ही सोय केली आहे. बंगाल, कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार या शहरांमधून आलेले बरेच कामगार या भागात आहेत. त्यांना सोनूच्या या मदतीचा पुरेपूर उपयोग होणार आहे. शिवाय भिवंडी येथील तळहातावर काम असणाऱ्या कामगारांच्चा पोटाचा प्रश्न महिनाभरासाठी तरी आता सुटला आहे. एक वेळचं चांगलं आणि पौष्टीक जेवण या कामगारांना आणि गरजूंना उपलब्ध होणार आहे. 

याआधीही सोनूने बरीच आर्थिक मदत देखील केली आहे. शिवाय त्याने मुंबईमधील आपलं एक पूर्ण हॉटेलच डॉक्टर, नर्सेस यांना राहण्यासाठी दिलं आहे. त्याचबरोबरीने जवळपास 45 हजार गरजूंसाठी सोनू जेवणाची, धान्याची सोय करत आहे. सोनू सध्या करत असलेलं हे काम इतरांनाही प्रेरणा देणारं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT