Sooraj Pancholi Jiyh Khan Death case rakhi sawant
Sooraj Pancholi Jiyh Khan Death case rakhi sawant  esakal
मनोरंजन

Sooraj Pancholi : 'आजकालच्या मुली...' जियाच्या आत्महत्या प्रकरणावर राखीची भलतीच प्रतिक्रिया

युगंधर ताजणे

Sooraj Pancholi Jiyh Khan Death case rakhi sawant reaction : राखी कधी काय बोलेल हे सांगता येत नाही. आपल्या बोलण्यामुळे काय होईल याचाही तिला अंदाज नसतो. बेफाम होत बेतालपणे काहीही बोलणाऱ्या राखीनं पुन्हा एकदा वेगळे वक्तव्य करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. राखीनं जिया खान आत्महत्या प्रकरणावर व्यक्त केलेलं मत अनेकांना खटकलं आहे.

वाट्टेल ते बोलून कायम लाईमलाईटमध्ये राहणे राखीला जमले आहे. ती तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. तिचं लग्न झालं खरं पण ते अवघ्या महिनाभरच टिकलं. त्यानंतर तिला तिच्या पतीनं आदिल दुरानीनं घटस्फोट दिला. त्यानंतर राखीनं वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्यं करुन नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडवून दिली होती. आता राखीनं प्रसिद्ध अभिनेता सुरज पांचोलीचा मुलगा सुरज पांचोलीची पाठराखण केली आहे.

Also read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्रसिद्ध अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून सुरज पांचोलीचे नाव होते. त्यावर कोर्टानं दिलेल्या निकालात सबळ पुराव्या अभावी त्याची सुटका केली. त्यानंतर राखीनं दिलेली प्रतिक्रिया कित्येकांच्या चर्चेचा विषय होताना दिसत आहे. सीबीआय कोर्टानं तब्बल दहा वर्षानंतर दिलेला निकाल सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतो आहे.

राखीनं आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, सुरज पांचोली हा माझा भाऊ आहे. मला एक गोष्ट कळत नाही. ती म्हणजे आजकालच्या मुली प्रेमात एवढ्या वेड्या का होतात आणि स्वताचा जीव का धोक्यात घालतात, आपण ज्यावर प्रेम केले त्यानं विश्वासघात केला म्हणून पुन्हा प्रेम करायचेच नाही का, तुम्हाला आणखी बॉयफ्रेंड मिळतील.तेव्हा त्याचा जास्त विचार करु नका.

माझ्याकडे पाहा, तुम्हाला कळेल मी किती आनंदी आहे. माझ्यावर गेल्या काही दिवसांत झालेला अन्याय तुम्ही पाहिला आहे. पण मी खूश आहे. आलेल्या परिस्थितीच्या विरोधात मी लढते आहे. आजकालच्या मुलींनी देखील ती गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. असे राखीनं म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT