south actor Thalapathy Vijay came running for the flood victims of tuticorin SAKAL
मनोरंजन

Thalapathy Vijay: पूरग्रस्तांसाठी थलापती विजय आला धावून! दिला मदतीचा मोठा हात

विजय पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलाय

Devendra Jadhav

Thalapathy Vijay News: तमिळ सुपरस्टार थलापथी विजय सध्या चांगलाच चर्चेत आहे. कॅप्टन विजयकांत यांच्या अंतिमदर्शनाच्या वेळी एका अज्ञात इसमाने विजयवर चप्पल फेकली. यावर विजयकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

अशातच विजय पूरग्रस्तांसाठी मदत करताना दिसला. विजयचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आज शनिवारी तुतिकोरिन विमानतळावर विजय दिसला. थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यातील पूरग्रस्त रहिवाशांना मदतीचा हात देण्यासाठी विजय शहरात आला होता.

विजयचे अनेक फोटो आणि व्हिडिओ त्याच्या फॅन क्लबने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत.

विजयने पुराचा गंभीर परिणाम झालेल्या कुटुंबांना मदत सामग्रीचे वाटप केले. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये विजय स्थानिकांशी आपुलकीने संवाद साधताना दिसत आहे.

"थलपथी विजय तुतीकोरीन येथील पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत साहित्य देण्यासाठी घटनास्थळी पोहोचला आहे," असं ट्विट X वर विजयच्या एका फॅन पेजने शेअर केलंय.

तमिळनाडूमध्ये अतिवृष्टीमुळे नाश केला. विशेषत: थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यांमध्ये पूरामुळे मोठं नुकसान घडलं. पुराच्या परिणामामुळे असंख्य रहिवाशांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यांना निवारा, अन्न आणि शुद्ध पिण्याचे पाण्याची कमतरता आहे

या पूरात रजनीकांत यांचे चेन्नईतील पोस गार्डन निवासस्थानावर सुद्धा परिणाम झाला.

थलपती विजयवर झाला हल्ला

ज्येष्ठ अभिनेते-राजकारणी विजयकांत यांच्या अंत्यसंस्कारात विजयला चप्पल फेकून मारली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विजय ‍विजयकांत यांना श्रद्धांजली वाहायला गेला होता. विजय हा कॅमेरामन आणि पत्रकारांच्या गर्दीतून विजयकांतच्या पार्थिवापर्यंत गेला.

विजयकांतच्या कुटुंबीयांशी बोलताना विजय भावूक झाला आणि डोळे पाणावले. विजयने सर्वांचा निरोप घेऊन त्याच्या गाडीकडे निघाल्यानंतर लगेचच त्याच्यावर चप्पल फेकण्यात आली. विजयच्या सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखत वेळीच हा हल्ला रोखला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT