south actor Vijay sethupathi reveals why he couldnt take up Amir khan laal singh chaddha 
मनोरंजन

आमिरच्या चित्रपटातून बाहेर पड़लो; विजयनं सांगितलं कारण

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  आमीर खानच्या बहुचर्चित अशा लाल चढ्ढा सिंग बद्दल गेल्या काही दिवसांपासून खूप काही ऐकायला मिळत आहे. करिनानं तर प्रेग्नंट असताना त्याचे शुटिंग पूर्ण केले होते. मात्र लाल चढ्ढा आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. तो म्हणजे साऊथचा प्रसिध्द अभिनेता विजय सेतूपती याच्या विधानामुळे. विजय आमिरच्या चित्रपटातून डेब्यु करणार होता. मात्र त्यानं माघार घेतली आहे. त्याचे कारण काय हेही त्यानं सांगितले आहे. विजयनं तो चित्रपटच सोडल्याचे कळते आहे.

आमिर खानच्या लाल चढ्ढा सिंग मध्ये प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपती अभिनय करणार हे ऐकून प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता होती. या दोन्ही पडद्यावर एकत्र पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार होती. मात्र आता तसे होणार नाही. आमिरनं तर स्वत विजयला या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचून दाखवली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

विजय आपल्या निर्णयावर ठाम होता. आता अशी एक अफवा पसरली होती की, विजयला आपल्या रोलसाठी वजन कमी करायला अडचण आली होती. मात्र आता विजयनं नेमक्या कोणत्या कारणासाठी लाल सिंह चढ्ढा सोडला याचे कारण समोर आले आहे.  द न्यूज मिनिट ने सांगितल्या नुसार विजय आता या चित्रपटाचा भाग नाही. त्याचे कारण वजन हे नाही.

विजयनं सांगितले की, आमिर सर यांनी मला वैयक्तिक मेसेज करुन हा चित्रपट करण्यास पुढाकार घेण्यास सांगितले होते. ते मला स्क्रिप्ट वाचून दाखवण्यासाठी तामिळनाडूला आले होते. तिथे मी एका चित्रपटाचे शुटिंग करत होतो. मात्र त्यांच्या सोबत दिग्दर्शक अव्दैत चंदन हे काही आले नव्हते. आमिरनं मला स्क्रिप्ट वाचून दाखवलं. ते रात्रीच्या वेळी शहरात थांबले आणि पुन्हा सकाळी निघून गेले. ते एक चांगले स्टोरीटेलर आहेत. त्यांनी ज्या पध्दतीनं मला गोष्ट सांगितली ती ऐकून मी लगेचच हो म्हटलो होतो.  
कोरोनामुळे माझ्या चित्रपटांचे शुटिंग रखडले होते. मी काही वर्षांपूर्वी हे चित्रपट साईन केले आहेत. कोरोनानं सगळं प्लँनिंग खराब केले होते. लॉकडाऊननंतर माझ्याजवळ ५ तेलगू प्रोजेक्टस् होते. त्यामुळे लाल सिंग चढ्ढाचा भाग होता आले नाही. 
 
 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT