nayanthara 
मनोरंजन

पाच वर्षे डेट केल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साखरपुडा; प्रभूदेवासोबत होतं अफेअर

स्वाती वेमूल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराच्या अफेअरच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. विग्नेश शिवनला ती डेट करत असून त्याच्यासोबतचे फोटो ती अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोतून नयनताराने साखरपुड्याचा इशारा दिला आहे. या फोटोमध्ये नयनताराच्या हातावर साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळतेय. विग्नेशनेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने तामिळ भाषेत कॅप्शन लिहिलं आहे. 'मी माझं आयुष्य तुझ्या हातात देत आहे', असं या कॅप्शनचा अर्थ होतो. त्यावरून या दोघांनी साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

२०१५ पासून करत आहेत डेट
नयनतारा आणि विग्नेश २०१५ पासून एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर दोघंही त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त होताना दिसतात. दोघं अनेकदा रोमँटिक फोटो पोस्ट करतात. 'नानुम राऊडी धान' या दाक्षिणात्य चित्रपटाच्या सेटवर या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. मध्यंतरीच्या काळात या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र त्यावर दोघांनी कधीच स्पष्टीकरण दिलं नाही. 

नयनताराचं प्रभूदेवासोबत होतं अफेअर
नयनतारा आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक प्रभूदेवा यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. इतकंच नव्हे तर नयनतारामुळे प्रभूदेवाचा संसार मोडला असंही म्हटलं जातं. ती प्रभूदेवाच्या प्रेमात इतकी वेडी होती की त्याच्यासाठी तिने धर्मही बदलला होता. हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 

नयनताराने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. २००३ मध्ये तिने ‘मनास्सीनाकरे’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांत काम केलं. आज टॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT