Costa Titch Death Esakal
मनोरंजन

Costa Titch Death: 27 वर्षीय रॅपरचा स्टेजवर गाताना अचानक मृत्यू, शेवटचा Video Viral

सकाळ डिजिटल टीम

अलीकडेच बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या जाण्याने इडस्ट्रीला धक्काच बसला. आता त्यातच आता दक्षिण आफ्रिकेचा लोकप्रिय रॅपर आणि कलाकार कोस्टा टिच याच्या निधनाची बातमी समोर आली आहे.

कोस्टा टिच शनिवारी म्हणजेच 11 मार्च रोजी जोहान्सबर्गमधील अल्ट्रा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करत होता. यावेळी त्याचा लाईव्ह शो करत असतांनाच तो गाताना स्टेजवर पडला. कोस्टा टिचच्या या शेवटच्या शोचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये कोस्टा परफॉर्म करताना दिसत आहे आणि तिथे उपस्थित असलेले सर्वजण त्याच्यासोबत डान्स करत आहेत. मग अचानक तो पडला, पण तिथे उभ्या असलेल्या लोकांनी त्याला उभे केले. लोकांना वाटते की तो अडखळला आणि पडला.

पण दुसऱ्याच क्षणी तो पुन्हा पडतो. थोड्या वेळाने प्रत्येकाला समजते की त्याचे हृदय बंद पडले. दक्षिण आफ्रिकेतील मीडिया व्यक्तिमत्त्व फिल म्फेला यांनी शनिवारी रात्री उशिरा ट्विटरद्वारे या बातमीची पुष्टी केली.

एम्फेलाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, RIP: Costa Titch. नेल्स्प्रूटमध्ये जन्मलेले कलाकार आणि डान्सर, खरे नाव कोस्टा त्सोबानोग्लू याच निधन झाले आहे. तो 27 वर्षांचा होता. 'बिग फ्लेक्सा', 'नकलकथा' आणि 'एक्टिवेट' यांसारख्या हिट चित्रपटांसह अमापियानो शैलीतील योगदानासाठी देखील टीच ओळखला जात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरात भाजपच्या दाव्यांना बंडखोरीचे ग्रहण; काँग्रेसचीही खास रणनीती, मनपात कुणाची येईल सत्ता?

सीन शूट करताना जितेंद्र जोशीला खरोखरच फास लागला ! अभिनेत्याने सांगितली भयानक आठवण, म्हणाला..

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: शुक्रादित्य राजयोगामुळे वृषभ राशीसह 5 राशींना मिळेल आदर अन् संपत्ती, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Marathi News Live Update : आरपीआय आठवले गटाला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्ष करणार भाजपात प्रवेश

IPL ची कॉपी करायला गेले अन् पाकडे तोंडावर आपटले; कवडी भावात विकली गेली PSL मधील हैदराबाद फ्रँचायझी, रिषभ-श्रेयस मिळून एवढे कमावतात...

SCROLL FOR NEXT