मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्री चित्रा यांचे निधन

आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रा यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे.

युगंधर ताजणे

आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रा south actress chitra यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. passed away त्या ५६ वर्षांच्या होत्या. वेगळी अभिनयशैली यामुळे त्यांनी टॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्यानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरही त्या अॅक्टिव्ह होत्या. त्यांच्या जाण्याचं वृत्त कळताच चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांनी त्यांना श्रद्घांजली वाहिली आहे. याशिवाय टॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी यावेळी त्यांना आदरांजलीही वाहिली आहे. त्यांच्या जाण्यानं टॉलीवूडचं मोठं नुकसान झाल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.

हृद्यविकाराच्या झटक्यानं चित्रा यांचं निधन झालं आहे. त्यांनी जवळपास शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान मिळवलेल्या चित्रा यांचा ख्यातनाम मल्याळम अभिनेंत्रीमध्ये समावेश होतो. प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक के एस रविकुमार यांच्या चेरन पांडियान आणि पांडियाराजन यांची गोपाला गोपाला मधील भूमिकेसाठी चित्रा यांना ओळखले जात होते. त्या चित्रपटांतील अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्यामुळेच त्या टॉलीवूडमध्ये नावारुपाला आल्या होत्या.

नेल्लनई जाहिरात जेव्हा प्रदर्शित झाली तेव्हापासून चित्रा यांना नेल्लनई चित्रा असे नाव देण्यात आले होते. अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले होते. ज्यामुळे चित्रा यांची ओळख सर्वदूर पोहचली. त्या काही काळ सामाजिक कार्यांमध्येही सहभागी झाल्या होत्या. सतत कार्यमग्न असणाऱ्या चित्रा यांचा आपल्या चाहत्यांशी संवाद असे. चित्रा यांनी आपल्या करिअरमध्ये तामिळ, तेलूगु, मल्याळम, कन्नड, यासारख्या भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले होते. याशिवाय सुपरस्टार मोहनलाल, प्रेम नजीर सारख्या दिग्गजांबरोबरही त्यांनी काम केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT