samantha 
मनोरंजन

अभिनेत्री समंथा अक्किनेनीचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल चाहते म्हणाले, 'क्वीन...'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- साऊथ सुपरस्टार समंथा अक्किनेनी तिच्या अभिनयानेच चाहत्यांना घायाळ करते. मात्र नुकतंच समंथाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये समंथा जबरदस्त वर्कआऊट करताना दिसतेय. समंथा अभिनयासोबतंच तिच्या योगा आणि वर्कआऊटसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.  याशिवाय समंथा अनेकदा तिच्या ऑरगॅमनिक फार्मिंगचे फोटो शेअर करत असते.  याआधी देखील समंथाने १०८ सुर्य नमस्कार घातल्याने ती चर्चेत राहिली होती. आता सफेद रंगाच्या टी शर्ट आणि काळ्या रंगाच्या जीम कॉश्च्युममध्ये समंथा वर्कआऊट करतेय.

समंथाचा हा वर्कआऊट व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी तर तिला क्वीन म्हटलंय. अभिनेत्री समंथा अक्किनेनी साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांची सून आहे. तर नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्यची ती पत्नी आहे. २०१७ मध्ये दोघांनी लग्न केलं होतं. समंथा आणि नागा चैतन्यची जोडी टॉलीवूडधील सगळ्यात लव्हेबल जोडींपैकी एक आहे. समंथाच्या सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

समंथा लवकरंच हिंदी सिनेमात पदार्पण करणार आहे. तसंच ती 'द फॅमिली मॅन सीझन २' या वेबसिरीजमध्ये देखील दिसणार आहे. यासाठी समंथा खूपंच उत्सुक आहे. सोबतंच ती विग्नेश शिवन दिग्दर्शित करत असलेल्या kaathu Vaakula Rendu kadhal  या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत विजय सेतुपती आणि नयनतारा देखील दिसतील. अभिनेता नागा चैतन्यचा आगामी लव्ह स्टोरीमध्ये त्याच्यासोबत साई पल्लवी देखील आहे. या सिनेमातं शूटींग जवळपास पूर्ण झालं आहे.     

south superstar samantha akkineni workout video went viral  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून चिडला: अम्पायरसोबत वाद

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT