ajith kumar 
मनोरंजन

तमिळ सुपरस्टार अजित कुमारच्या चाहत्याची आत्महत्या 

स्वाती वेमूल

'विश्वासम', 'वेदालम' आणि 'वीरम' यांसारख्या सुपरहिट चित्रपट देणारा तमिळ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा चाहता वर्ग आहे. चाहते आपल्या लाडक्या कलाकारासाठी अनेक गोष्टी करत असतात. मात्र अनेकदा यात मर्यादासुद्धा ओलांडली जाते. अशीच एक दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. अजित कुमारच्या एका चाहत्याने आत्महत्या केली. अजित कुमारच्या फॅनपेजेसवर याविषयीचा मेसेज तुफान व्हायरल होत आहे. 

या चाहत्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र त्याच्या कुटुंबीयांना मदत करा व त्याच्यासाठी प्रार्थना करा, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अजित कुमारच्या एका फॅनक्लबने त्या चाहत्याचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. त्या चाहत्याने शरीरावर बरेच टॅटू काढल्याचं पाहायला मिळत आहे. 

तमिळ चित्रपटसृष्टीत अजित कुमार 'थाला' (प्रमुख व्यक्ती) या नावाने ओळखला जातो. अजितने १९९० मध्ये 'एन वीजु एन कानावर' या दाक्षिणात्य चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी अजितला तमिळ चित्रपटांमध्ये आणलं होतं, असं म्हटलं जातं. अजितने आतापर्यंत ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९९३ मध्ये 'अमरावती' या चित्रपटात त्याने पहिल्यांदा मोठी भूमिका साकारली होती. त्यानंतर वेदालम, वीरम, येन्नई अरिंधाल, विवेगम, आरंभम हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफार गाजले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! 20 दिवसांत सोनं 35 हजारांनी कोसळलं; चांदी 1.85 लाखांनी घसरली, पाहा आजचे ताजे भाव

Jitendra Dudi: भीमाशंकर गावठाणाचे होणार स्थलांतर: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामस्थांची अटीशर्तीवर मान्यता!

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची आज 'देवगिरी'वर बैठक

Chicken bird flu: सावधान! शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; १००० कोंबड्यांचा मृत्यू

Ashok Kharat Case : खरातचे कारनामे संपेनात ! आधी पीडित महिलांची अब्रू लुटायचा अन् मग श्रीमंत पुरूषांशी लैंगिक संबंध ठेवायला लावायचा...

SCROLL FOR NEXT