Special things belongs to sridevi auctioned on 10th october
Special things belongs to sridevi auctioned on 10th october Instagram
मनोरंजन

Sridevi: 'या' सिनेमातील श्रीदेवीच्या खास गोष्टींचा लवकरच होतोय लिलाव, वाचा सविस्तर

प्रणाली मोरे

Sridevi:बॉलीवूडला श्रीदेवी सारखी अभिनेत्री पुन्हा मिळणं हे आता स्वप्नच राहील बहुधा. कारण श्रीदेवी सारखी कलाकार आजापर्यंत न झाली ना होणं शक्य... असं प्रत्येकजण कबूल करुन मोकळं झालं आहे. सिल्व्हर स्क्रीनवरील आपल्या अस्तित्वानं एकेकाळी लोकांना वेड लावणारी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी विषयी मोठी अपडेट समोर येत आहे. बातमी आहे की,१० ऑक्टोबर रोजी श्रीदेवीशी संबंधित काही खास गोष्टींचा लिलाव होणार आहे. चला जाणून घेऊया काय आहेत त्या खास गोष्टी... (Special things belongs to sridevi auctioned on 10th october)

रिपोर्ट्सनुसार 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमाची दिग्दर्शिका गौरी शिंदेनं सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं अनोख्या अंदाजात हा आनंद सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला आहे. १० ऑक्टोबर रोजी श्रीदेवीच्या 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमाला १० वर्ष पूर्ण होणार आहेत,या प्रसंगी गौरी शिंदेनं श्रीदेवीनं सिनेमात नेसलेल्या साड्यांचा लिलाव करण्याचं ठरविलं आहे. याविषयी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना गौरी शिंदे म्हणाल्या,''या खास दिवसाला साजरं करण्यासाठी आम्ही अंधेरीत एका सिनेमागृहात 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमाचं स्क्रींनिगही ठेवलं आहे. त्यासोबतच सिनेमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांशी मी स्वतः संवादही साधणार आहे''.

दिग्दर्शिका गौरी शिंदे पुढे म्हणाल्या,''मी आजपर्यंत श्रीदेवी यांनी सिनेमात नेसलेल्या सर्व साड्या जपून ठेवल्या आहेत. आणि 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं मी त्या साड्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे''. गौरी म्हणाल्या,''या लिलावातून जे पैसे मिळतील ते एका एनजीओला गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येतील''.

श्रीदेवी यांनी हिंदी सिनेइंडस्ट्रीतून १९९७ साली ब्रेक घेतला होता,त्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये गौरी शिंदेच्या 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमातून कमबॅक केलं. या सिनेमातील त्यांच्या भूमिकेनं पुन्हा लोकांवर श्रीदेवी नावाची भुरळ घातली. अनेक वर्षांनंतर पुर्नपदार्पण करुनही स्क्रीनवरचं त्यांचं वावरणं सर्वांनाच मोहिनी घालून गेलं. या सिनेमात श्रीदेवी यांनी अशा हाउसवाइफची भूमिका साकारलेली जिला इंग्लिश बोलता येत नसतं,आणि तिंच स्वतःचं कुटुंब तिला यासाठी अनेकदा अपमानित करण्याचा प्रयत्न करतं. पण या सगळ्याला ती हाउसवाइफ ज्या पद्धतीनं उत्तर देते,त्यासाठी काय करते तो प्रवास सर्वच महिलांना प्रेरणा देणारा ठरला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Accident News: इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश

IPL Qualifier 1: मिचेल स्टार्कची 24 कोटी वसूल करणारी कामगिरी! हेडचा त्रिफळा उडवलाच, पण KKR ला दिली स्वप्नवत सुरुवात

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील सीसीटीव्ही फुटेज् अन् आरोपींच्या माहितीचा ताळमेळ बसेना, नेमकं काय झालं?

Bacchu Kadu vs Sachin Tendulkar : तर सचिन तेंडुलकरचा पुतळा जाळणार... बॉडीगार्डनं जीवन संपवल्यानंतर बच्चू कडूंनी साधला निशाणा

Silver Price Update : चांदीचे दर गगनाला भिडले! इराण अन् सौदीत टेन्शन वाढल्याने १ लाखाच्या वर जाणार किंमत

SCROLL FOR NEXT