actress rasika sunil romantic photoshoot with aditya bilagi file image
मनोरंजन

लग्नानंतर रसिका परदेशात स्थायिक होणार? चर्चांवर अखेर दिलं उत्तर

रसिकाचा पती आदित्य बिलागी हा सॉफ्टवेअर इंजिनीअर असून तो लॉय एंजिलिसमध्ये राहतो.

स्वाती वेमूल

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील Rasika Sunil हिने लॉय एंजिलिसमधला सॉफ्टवेअर इंजिनीअर आदित्य बिलागीशी Aditya Bilagi नुकतीच लग्नगाठ बांधली. १८ ऑक्टोबर रोजी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला रसिका आणि आदित्यचे नातेवाईक आणि मोजकेच मित्रमंडळी उपस्थित होते. सध्या रसिका आणि आदित्य औरंगाबादमध्ये लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करत आहेत.

याविषयी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत रसिका म्हणाली, "आदित्य आणि मला मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करण्याची इच्छा होती आणि समुद्रकिनारी लग्नाचा विचार हा माझा होता. लग्नाला येणारे पाहुणे हे त्यांच्या दैनंदिन टेन्शनपासून मुक्त होऊन लग्नाचा आनंद घेऊ शकतील, हा त्यामागचा विचार होता. अगदी पाय दुखेपर्यंत आम्ही नाचत होतो. आदिचे काका जगदीश बिलागी यांनी तर आमचं एकत्र नाचतानाचं अप्रतिम शिल्पदेखील बनवलं. "

रसिका लग्नानंतर परदेशात राहायला जाणार असल्याची चर्चा होती. त्यावर ती पुढे म्हणाली, "आम्हा दोघांनाही आमच्या करिअरवर खूप प्रेम आहे. मी इथेच माझं काम करत राहीन आणि आदित्य लॉस एंजिलिसमध्ये त्याचं काम करेल. दोन विविध देशांमध्ये असलो तरी आम्ही सर्व गोष्टी सांभाळून घेऊ असा विश्वास आहे. या अंतराबद्दल आम्हाला चिंता नाही "

"लग्नानंतरची ही आमची पहिली दिवाळी आहे. आदित्य आणि माझ्या बाबांकडून मला खूप काही भेटवस्तू मिळणार आहेत. लक्ष्मीपूजनापर्यंत आम्ही औरंगाबादमध्येच होतो. पाडव्याच्या दिवशी (५ नोव्हेंबर) आम्ही पुन्हा ठाण्याला परत येणार आहोत. ७ नोव्हेंबरपासून मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे त्याआधी सणांचा पूर्ण आनंद मी घेतेय", असं ती पुढे म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT