spruha joshi 
मनोरंजन

Vidoe : सीनसाठी आणले सुके बोंबील; शूटिंगनंतर सहकलाकरांसह स्पृहाने पाडला फडशा

स्वाती वेमूल

कामासाठी तासनतास सेटवरच वेळ घालवणाऱ्या कलाकारांसाठी ते जणू एक दुसरं कुटुंबच असतं. शूटिंगदरम्यान किंवा दिवसभरातील काम आटोपल्यानंतर मिळालेल्या वेळेत मग हे कलाकार धमाल मजा मस्ती करतात. मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने आऊटडोअर शूटिंगचा असाच एक मजेशीर किस्सा चाहत्यांना सांगितला आहे. एका शूटिंगनिमित्त स्पृहा आणि तिचे सहकलाकार अलिबागला गेले होते. तिथे शूट करताना एका सीनसाठी सुके बोंबील आणले होते. शूटिंग संपल्यानंतर त्याच सुक्या बोंबीलांवर स्पृहा आणि तिच्या सहकलाकारांनी फडशा पडला. स्पृहाने संपूर्ण टीमसाठी सुक्या बोंबीलाची खास डिश बनवली होती. त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

स्पृहाची खास डिश
'आऊटडोअर शूटिंगनिमित्त माझ्या सहकलाकारांसाठी मी स्वयंपाक करतेय. या सुंदर महिलेसोबत मी किचनमध्ये काम करतेय आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या सर्वांसोबत केलेली धमाल मजामस्ती ही अमूल्य आहे. अलिबागला शूट करताना सुके बोंबील सीनसाठी म्हणून आणले होते. आम्ही शूट संपल्यावर त्यांचा फडशा पाडला. माझ्या लहानपणी मी, आई आणि क्षिप्रा दुपारी भूक लागली की असंच गॅसवर भाजून तिखट, मीठ, लिंबू लावून बोंबील खायचो. आमच्या तिघींचं ते खास सिक्रेट होतं. आज कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या', अशी पोस्ट स्पृहाने लिहिली. या व्हिडीओत स्पृहा सुके बोंबील एका महिलेसोबत मिळून गॅसवर भाजताना दिसतेय. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सहज दिसून येतोय. 

स्पृहा अलीकडेच 'सूर नवा ध्यास नवा' या गायन कार्यक्रमाचं निवेदन करताना दिसून आली. स्पृहाने केलेल्या कवितांना सोशल मीडियावर विशेष पसंती मिळते. त्याचप्रमाणे स्पृहाने तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. होम स्वीट होम, मोरया, पैसा पैसा, मायबाप, विकी वेलिंगकर यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT