Squid Game Web serise esakal
मनोरंजन

Squid Game: स्क्विड गेम्सचा 'रियॅलिटी शो', बक्षीसाची रक्कम ऐकून बसेल धक्का!

जगभरामध्ये ज्या मालिकेनं प्रेक्षकांची झोप उडवली अशा स्क्विड गेम्सचा दुसरा सीझन येणार आहे असे कळताच प्रेक्षकांची (Tv enertainment news) उत्सुकता पुन्हा एकदा वाढली आहे.

युगंधर ताजणे

Squid Game The Challenge : जगभरामध्ये ज्या मालिकेनं प्रेक्षकांची झोप उडवली अशा स्क्विड गेम्सचा दुसरा सीझन येणार आहे असे कळताच प्रेक्षकांची (Tv enertainment news) उत्सुकता पुन्हा एकदा वाढली आहे. कोरियन बनावटीच्या या मालिकेनं जगभरातील नेटकऱ्यांना वेडावून टाकल्याचे दिसून (Netflix) आले. रहस्य, अॅक्शन, क्रुरता, हिंसा, यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींचा मालमसाला स्क्विड गेम्समध्ये होता. पैशांची हाव माणसाला त्याच्या शेवटच्या क्षणापर्यत (Social media viral news) कशाप्रकारे झुंजत ठेवते हे अतिशय प्रभावीपणे या मालिकेतून प्रेक्षकांनी पाहिले. आणि त्याच्या निर्मात्याला, दिग्दर्शकावर कौतूकाचा वर्षाव केला.

सध्या स्क्विड गेम्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे या (Squid Games) मालिकेच्या नावानं रियॅलिटी शो सुरु होणार आहे. ज्या प्रेक्षकांनी ही मालिका पाहिली असेल त्यांना या मालिकेच्या नावानं जेव्हा रियॅलिटी शो सुरु (Viral News) होणार असे सांगितल्यावर मोठा धक्काच बसला असेल. रियॅलिटी शो मध्ये तर मालिकेप्रमाणे काही होणार नाही ना, असा प्रश्न त्यांना पडला आहे. आता नेटफ्लिक्सनं स्क्विड गेम द चँलेंज (Squid Game:The Challenge) नावाच्या एका शो चे आयोजन करण्याचे ठरवले आहे. नेटफ्लिक्सनं स्क्विड गेम्सवर आधारित या मालिकेची निर्मिती केलेली आहे. मात्र नव्यानं जो रियॅलिटी शो समोर येणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारे जीवाची बाजी लावावी लागणार नाही. फक्त त्या शो मध्ये जो कुणी हारेल त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. असे सांगण्यात आले आहे.

या रियॅलिटी शो मध्ये जगभरातून 456 जण सहभागी होणार आहेत. त्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या गेम्समध्ये भाग घेता येणार आहे. त्याच्या आधारे विजेत्याची निवड केली जाईल. त्या गेम्समध्ये एखाद्याचा पराभव झाल्यानंतर त्याला पूर्ण गेम्समधूनच बाहेर काढले जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या रियॅलिटी शोचे एकुण दहा भाग असणार आहेत. सर्व गेम्स जिंकणाऱ्याला 36 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT