Sridevi Prasanna movie trailer out now starring sai tamhankar siddharth chandekar SAKAL
मनोरंजन

Sridevi Prasanna Trailer: "टक्कल पडायच्या आधी लग्न करावं!", सई - सिद्धार्थच्या 'श्रीदेवी प्रसन्न'चा धम्नाल ट्रेलर रिलीज

श्रीदेवी प्रसन्नचा धम्माल ट्रेलर रिलीज झालाय

Devendra Jadhav

Shri Devi Prasanna Trailer News: मराठी मनोरंजन विश्वात नवीन वर्षात सत्यशोधक, पंचक आणि ओले आले हे सिनेमे रिलीज झाले. या तिनही सिनेमांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.

अशातच नवीन वर्षातला मराठी मनोरंजन विश्वातला नवा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचं नाव 'श्रीदेवी प्रसन्न'. सई ताम्हणकर - सिद्धार्थ चांदेकर यांच्या नवीन सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय.

(Sridevi Prasanna movie trailer out now starring sai tamhankar siddharth chandekar)

श्रीदेवी प्रसन्न चा ट्रेलर रिलीज

'श्रीदेवी प्रसन्न'चा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये सिद्धार्थ - सई अरेंज मॅरेजपद्धतीने लग्न करायला उत्सुक आहेत. दोघांची भेट होते. नंतर सुरु होते अरेंजवाली लव्हस्टोरी.

सईचं कुटुंब फिल्मी असतं. तर सिद्धार्थचं कुटुंब त्याच्या लग्नासाठी उत्सुक असतं. सई - सिद्धार्थ एकमेकांना भेटतात. मग पुढे एक ट्विस्ट येतो. या दोघांचं लग्न जुळणार का? श्रीदेवी प्रसन्न नवरा - बायको होणार का? हे तर सिनेमा बघूनच समजेल.

श्रीदेवी प्रसन्नमधील कलाकार

टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीप्स मराठीचा हा पहिला वहिला मराठी चित्रपट असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची खुप उत्सुकता आहे.

या चित्रपटात सई आणि सिद्धार्थ यांच्यासोबतच सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार दिसणार आहे.

या तारखेला होणार 'श्रीदेवी प्रसन्न' रिलीज

विशाल विमल मोढवे दिग्दर्शित 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमाचं नावच फिल्मी नाही तर हा सिनेमा देखील प्रेक्षकांचे तितकेच मनोरंजन करेल आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल यात काही शंका नाही. 'श्रीदेवी प्रसन्न'चा ट्रेलर पाहून सर्वांना सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET मध्ये अपयश, मग बनला फेक ब्रिगेडियर; दोन कमांडो, खांद्यावर स्टार्स, गाडीवर झेंडा... 21 वर्षीय तरुणाचा धक्कादायक कारनामा!

Petrol-Diesel-CNG Price Today: कच्च्या तेलाचे भाव घसरले; पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का? जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचे नवे दर

Gaalmukt Dharan Yojana : मंत्र्यांमधील वादात नाला खोलीकरण रखडले; राळेगाव मतदारसंघातील 81 कामांना स्थगिती, आदिवासी विकास मंत्र्यांचे पत्र

Maharashtra SC Classification : शासकीय वसतिगृह प्रवेश जाहिरातीत एससी प्रवर्गाची विभागणी; नव्या वादाला फुटले तोंड, राज्यात उपवर्गीकरण लागू?

जुहूतील आलिशान घर ते लक्झरी कार! श्रद्धा कपूरची संपत्ती ऐकून थक्क व्हाल! तब्बल'इतक्या' कोटींची आहे मालकीन

SCROLL FOR NEXT