Main Nahi Toh Kaun srushti tawde esakal
मनोरंजन

Hustle 2.0: 'कोण आहे सृष्टी तावडे'? 'मैं नही तो कौन बे'चा धुमाकूळ

सृष्टीविषयी जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नेटकऱ्यांनी गुगलचा आधार घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Main Nahi Toh Kaun: एमटीव्हीचा सिगिंग रियॅलिटी शो सुरु आला आणि देशातील तरुणांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. त्या रियॅलिटी शो चे नाव हसल 2.0 असे आहे. जो की रॅपचा रियॅलिटी सिंगिंग शो आहे. ज्याला अवघ्या काही दिवसांत प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. आपल्याकडे गली बॉय हा रॅपवर आधारित चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता. ज्याला भारताकडून त्या वर्षीच्या ऑस्करसाठी पाठविण्यात आले होते. अर्थात त्याला काही ऑस्कर मिळाला नाही. मात्र या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की आता हसल 2.0 ने तरुणांना वेड लावले आहे.

सोशल मीडियावर हसल 2.0 मध्ये गाणाऱ्या गायकांची मोठी हवा आहे. मात्र यासगळ्यात सर्वाधिक चर्चा आहे ती प्रसिद्ध रॅपर तावडेची. तिनं गेल्या काही दिवसांत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यामुळे श्वेता कमालीची चर्चेत आली आहे. तिचं रॅप, त्यातील शब्द, परखड भाष्य, विषयाची निवड हे सारं तरुणाईला कमालीचे आवडले आहे. यासगळ्यात तिचं मैं नही तो कौन बे....या रॅपनं तर अनेकांना वेडं केलं आहे. युट्युबवर पावणे दोन कोटी व्हयुज या व्हिडिओला मिळाले आहेत. त्यावरुन त्याची लोकप्रियता लक्षात येईल. सध्या श्वेताचं ते रॅप अनेकांच्या ओठी आहे.

कोण आहे सृष्टी तावडे?

हसल 2.0 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालेली श्वेताचा शोध आता गुगलवर घेतला जातोय. ती कोण आहे, काय करते, याविषयी अनेकांना जाणून घ्यायचे आहे. तिचं बॅकग्राउंड काय आहे, ती रॅपर कशी झाली याची माहिती तिच्या चाहत्यांना हवी आहे. सुष्टी महाराष्ट्रात राहणारी असून हसल 2.0 मध्ये येण्यापूर्वी ती एक कंटेट रायटर म्हणून काम करत होती. मुंबईत जन्म झालेल्या सृष्टीचं वय 20 वर्षे आहे. सोशल मीडियावर ती सर्वाधिक सर्च होणारी सेलिब्रेटी झाली आहे. तिच्या चिल किंडा, भगवान बोल रहा हू, छोटा डॉन, मेरा बचपन कहा गया आणि मैं नही तो कौन बे सारख्या रॅपला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

हसल मध्ये येण्यापूर्वी तिला रॅप लिहिण्याची आवड होती. या शोमध्ये गेल्यावर त्या कल्पकतेला अधिक सर्जनशीलतेचे वेध लागले होते. काही दिवसांपूर्वी तिनं नेपोटिझवर आधारित एक रॅप लिहिलं होतं. इंस्टावरही सृष्टीला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तिला 5 लाख फॉलोअर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT