stand up comedian kunal kamra refused to apologize on the tweet against the supreme court 
मनोरंजन

मी न्यायालयाची माफी मागणार नाही; कुणाल कामरा ठाम 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कुणाल कामरा हा आता मोठा सेलिब्रेटी झाला आहे. यापूर्वी तो एक कॉमेडियन म्हणून सर्वांना माहिती होता. सोशल मीडियावर त्याला फॉलो करणा-यांची संख्या मोठी आहे. तो ही आपली राजकीय, सामाजिक मतं जाहिरपणे सोशल मीडियावर मांडत असतो. अशावेळी त्याला टीकेला सामोरे जावे लागते. कुणालची भूमिका मात्र ठाम असल्याचे पाहवयास मिळाले आहे. आपण जे बोललो त्याबद्दल त्याला पश्चाताप वाटत नसल्याचे त्याच्या कृतीवरुन दिसून आले आहे. आताही तो एका वादात सापडला आहे. हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. मात्र त्यावर कुणालनं माफी मागण्यास नकार दिला आहे.

कुणालनं सर्वोच्च न्यायालय़ाची माफी मागण्यास नकार दिला आहे. त्य़ानं सादर केलेल्या अर्जात असे म्हटले आहे की, जे कोणी जास्त शक्तिमान आहेत, मोठी संस्थाने आहेत त्यांना विरोध करणे चूकीचे आहे का, आपल्या देशात कलाकार हे असंघटित आहेत. अशावेळी अनेक लॅपडॉग डोके वर काढून त्रास देतील त्यांचे काय करणार हा प्रश्न आहे. जर न्यायालय असे म्हणत असेल की, त्यांनी एक सीमारेषा आखून घेतली आहे. तसे असेल तर इंटरनेटवर बंदी घालायला हवी. म्हणजे कश्मिरी मित्रांना 15 ऑगस्टच्या दिवशी हॅप्पी इंडिपेंडस डे च्या शुभेच्छाचे पोस्टकार्ड लिहिता येईल.

18 डिसेंबर रोजी कामराला न्यायपालिका आणि न्यायधीश यांचा सोशल मीडियावर पोस्ट शेयर करुन अपमान केल्याप्रकरणी नोटीस पाठविण्यात आली होती. त्यावेळी अॅटॉर्नी जनरल केके वेणूगोपाल यांनी कारवाई सुरु करण्याची परवानगीही दिली होती. कामरानं त्या नोटीसीला उत्तर पाठवले होते. न्यायधीशांना विनोदाशिवाय दुसरी कुठली सुरक्षा बद्दल माहिती नाही. जनतेला तुमच्याबद्दल विश्वास वाटावा यासाठी न्य़ायालयाची स्थापना करण्यात आली आहे. 

मुनव्वर फारुकी सारख्या हास्य कलाकारांना त्यांच्या विनोदासाठी तुरुंगात टाकले जाते. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वतंत्रतेवर हल्ला होत असल्याचे म्हणतो. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. शाळेतल्या मुलांची देशद्रोही च्या कारणासाठी विचारपूस केली जात आहे. याला काय म्हणावे, असा प्रश्न कुणालनं विचारला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Chahar Divorce: क्रिकेटर राहुल चहरचा घटस्फोट!, भाविनक पोस्टद्वारे सोशल मीडियावर झाला व्यक्त

Amravati Crime : भारवाडीनजीक युवकाची निर्घृण हत्या, हल्लेखोर पसार; मृत व्यक्ती गुजरातचा रहिवासी

Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर; अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, सुनावणीत काय घडलं?

Amravati News : महापालिकेच्या स्थायी समितीत महायुतीचे वर्चस्व, आठ स्वीकृत सदस्यांची निवड

Budget: अजित पवारांच्या निधनाची चौकशी, ९ लाख कोटींचं कर्ज अन्...; 'हे' मुद्दे महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तापवणार!

SCROLL FOR NEXT