Lagin Drama Winner Sakal
मनोरंजन

Drama Competition : राज्य नाट्य स्पर्धेत पुण्यातून ‘लगीन’ची बाजी; ‘द सिक्रेट ऑफ लाईफ’ द्वितीय

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनायलयातर्फे आयोजित ६२ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत ‘मंगल थिएटर्स, पुणे’ या संस्थेच्या ‘लगीन’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनायलयातर्फे आयोजित ६२ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत ‘मंगल थिएटर्स, पुणे’ या संस्थेच्या ‘लगीन’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच ‘मॉडर्न महाविद्यालय, पुणे’ या संस्थेच्या ‘द सिक्रेट ऑफ लाईफ’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाले. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली. ‘शब्दधन सोशल फाउंडेशन, पुणे’ या संस्थेच्या ‘बैदा’ या नाटकाने तृतीय पारितोषिक पटकावले. ‘लगीन’ या नाटकासाठी विनोद रत्ना यांनी आणि ‘द सिक्रेट ऑफ लाईफ’ या नाटकासाठी शुभंकर वाघोले यांनी अनुक्रमे दिग्दर्शनाचे प्रथम व द्वितीय पारितोषिक पटकावले.

भरत नाट्य संशोधन मंदिरात २० नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत एकूण २३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. प्रत्येक प्रयोगाला रसिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली. संपूर्ण स्पर्धेदरम्यान सुमारे सात हजार तिकिटांची विक्री झाली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जुगलकिशोर ओझा, चंद्रकांत झाडकर आणि अनुया बाम यांनी काम पाहिले.

अन्य पारितोषिके -

१) प्रकाशयोजना - प्रथम - निखिल मारणे, द्वितीय - अभिप्राय कामठे

२) नेपथ्य - प्रथम - ऋतुजा बोढे, द्वितीय - विजय वाघ

३) रंगभूषा - प्रथम - अरविंद सुर्य, द्वितीय - सचिन थोरात

४) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक - राघवेंद्र कुलकर्णी आणि उन्नती कांबळे

५) अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे - नेहा नाईक, कीर्ती कदम, शीतल इनामदार, देविका भोसले, अनुष्का पानसरे, अक्षय काळकुटे, अमोद देव, योगेश सातपुते, सुनील शिंदे, सुहास संत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

Pune Crime: पुण्यात मोठी कारवाई; ‘एमडी’ ड्रग्ज कारखाना उघडण्याचा कट उधळला, सव्वा कोटींच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक!

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

SCROLL FOR NEXT