story behind animal jamal kudu dance step ranbir kapoor rashmika mandanna  SAKAL
मनोरंजन

Animal Bobby Deol: 'जमाल कुडू' डान्स स्टेप्स बॉबी देओलला कशी सुचली? वाचा हा भन्नाट किस्सा

'अ‍ॅनिमल' सिनेमामधील गाजलेली जमाल कुडू डान्स स्टेप कशी सुचली? वाचा हा किस्सा

Devendra Jadhav

Animal Bobby Deol News: 'अ‍ॅनिमल' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर आजवर चांगली कामगिरी केलीय.  'अ‍ॅनिमल' सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफीसवर ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय.

'अ‍ॅनिमल' मधलं जमाल कुडू हे गाणं सध्या चांगलंच गाजतंंय.  'अ‍ॅनिमल' मधील बॉबी देओलच्या एन्ट्रीला हे गाणं वाजतं. हे गाणं आणि त्यावर केलेली बॉबी देओलची डान्स स्टेप सध्या चांगलीच गाजतेय. पण ही डान्स स्टेप कशी निर्माण झाली. त्यामागचा हा किस्सा वाचा.

बॉबीने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. बॉबी म्हणाला, "संदीप रेड्डी वंगाने मला आधीच म्यूझिक ऐकायला लावले होते. त्याला संगीताची खूप चांगली समज आहे. त्याला चित्रपट निर्मितीशी संबंधित सर्व गोष्टींची चांगली जाण आहे. त्याला हे गाणे कुठेतरी सापडले आणि मला ते गाण्यास सांगितले. तुझ्या एंट्रीमध्ये मी हे म्यूझिक वाजवेल. यानंतर जेव्हा आम्ही शूटिंग सुरू केले, तेव्हा कोरिओग्राफरने सांगितल्याप्रमाणे मी नाचू लागलो. पण तो मला म्हणाला नाही.. नाही.. बॉबी देओलसारखे करू नकोस. मग सौरभ, जो माझ्या भावाची भूमिका करतो. मी त्याला म्हणालो, 'तू ही डान्स स्टेप कशी करशील."

बॉबीने पुढे सांगितले की, "मला अचानक मी तरुण असतानाचा काळ आठवला. जेव्हा मी पंजाबमध्ये जाऊन इतरांसोबत डोक्यावर ग्लास ठेऊन दारू प्यायचो. आम्ही हे का केले हे मला कधीच समजले नाही. हे अचानक माझ्या मनात आले आणि मी ते केले. संदीपला ते आवडले."

अशाप्रकारे जमाल कुडूची डान्स स्टेप तयार झाली.

'अ‍ॅनिमल' ची बॉक्स ऑफीस कमाई

'अ‍ॅनिमल' सिनेमाने Sacknilk रिपोर्टनुसार, रिलीजच्या सातव्या दिवशी 25.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आकडेवारीसह अ‍ॅनिमल'ने एकूण आठवड्याभरात जगभरात ६०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.

अ‍ॅनिमल सिनेमात रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी यांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवाजी पार्कसाठी ठाकरे बंधू अन् भाजप-शिंदेसेनेचाही अर्ज, एकच तारखा; कुणाला मिळणार परवानगी?

Crime News: काकाच्या हत्येचा बदला? नमाजानंतर चाकूहल्ला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल ठार, जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट!

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

भाविकांसाठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस राहणार बंद; मूर्तीवर लवकरच हाेणार रासायनिक प्रक्रिया..

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT