stroy of dharmaveer 2 direct relation to balasaheb thackeray prasad oak revealed by producer mangesh desai SAKAL
मनोरंजन

Dharmaveer 2: काय असणार धर्मवीर 2 ची कथा? बाळासाहेब ठाकरेंशी थेट संबंध? निर्माते मंगेश देसाईंनी केला महत्वाचा खुलासा

धर्मवीर 2 मध्ये काय कथानक असणार याचा उलगडा निर्माते मंगेश देसाईंनी केलाय

Devendra Jadhav

Dharmaveer 2 News: धर्मवीर 2 सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. काहीच दिवसांपुर्वी निर्माते मंगेश देसाई यांनी धर्मवीर 2 ची घोषणा जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीने केलीय. पुन्हा एकदा प्रवीण तरडे धर्मवीर 2 ची धुरा सांभाळणार आहेत.

धर्मवीर 2 मध्ये आपण पाहिलं की आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातलं गुरु शिष्याचं नातं कसं होतं याची थोडीशी झलक पाहायला मिळाली. आता धर्मवीर 2 मध्ये काय कथानक असणार याचा उलगडा निर्माते मंगेश देसाईंनी केलाय.

साहेबांच्या माहित नसलेल्या गोष्टी धर्मवीर 2 मधुन उलगडणार

ABP ला दिलेल्या मुलाखतीत मंगेश देसाईंनी खुलासा करताना म्हणाले की.. ,"ज्वलंत हिंदुत्वासाठी आनंद दिघेंनी अनेक आंदोलने केली. आनंद दिघेंचं चरित्र दाखवताना दोन भाग नव्हे तर चार भागही पुरणार नाहीत. पहिल्या भागात आनंद दिघेंच्या अनेक गोष्टी दाखवायच्या राहिल्या. मलंगगड, बाबरी मस्जिद अशा अनेक गोष्टींमागे दीघे साहेबही होते.

याशिवाय दहावीची सराव परिक्षा दिघे साहेबांनी सुरू केली, हे फार कमी जणांना ठाऊक असेल. तसेच निवडणुकीची स्टॅटर्जी, योजना कशाप्रकारे आखायच्या अशा बऱ्याच महत्वाच्या गोष्टी धर्मवीर 2 सिनेमात दाखवण्यात येणार आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांचं प्रबोधन सुद्धा करेल".

राजकारण आणि सिनेमा या दोन वेगळ्या गोष्टी

मंगेश देसाई पुढे महत्वाचा खुलासा करत म्हणाले की, "'धर्मवीर' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. त्यात कोणी हिंदुत्व न मानणाऱ्यांसोबत गेलं तर कोणी बाळासाहेबांच्या विचारावर ठाम राहिलं आणि वेगळा मार्ग निवडला. तरी आमचंच हिंदुत्व खरं, असं दोन्हीकडील पक्ष म्हणतात."

मंगेश देसाई शेवटी म्हणतात, "राजकारण आणि सिनेमा या दोन्ही गोष्टी एकमेकांपासुन वेगळ्या आहेत. 'धर्मवीर' बनवताना माझा कोणताही राजकीय अजेंडा नव्हता. एक निर्माता म्हणून मी या सिनेमाची निर्मिती केली. बऱ्याच गोष्टी योगायोगाने घडत असतात. त्यातली ही योगायोगाने घडलेली गोष्ट आहे.

दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट

मंगेश देसाई शेवटी सांगतात, "साहेबांच्या ज्या गोष्टी दाखवायच्या राहिल्या आहेत. त्या दाखवण्याचा प्रयत्न 'धर्मवीर 2' मध्ये करण्यात येईल. दिघे साहेबांच्या प्रत्येक कृतीत हिंदुत्वाची जोड आहे आणि हीच जोड आता भाग दोन मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. याशिवाय बाळासाहेब ठाकरे आणि दीघे साहेब यांचा समान धागा म्हणजे हिंदुत्व. या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट 'धर्मवीर 2' मध्ये पाहायला मिळेल."

धर्मवीर 2 २०२४ ला रिलीज व्हायची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शबरीमलातील चोरीची सीबीआय चौकशी करा'' भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांची मागणी

Velhe News : लागोपाठ तीन दिवस राजगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; दहा ते पंधरा पर्यटक किरकोळ जखमी

Bhoom News : दबंग खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध भूमचे पोलीस निरीक्षक वाद पेटणार

Beed: धर्मांतरासाठी कैद्यांवर दबाव, कारागृह अधीक्षकांविरोधात तक्रार; बीडमध्ये नेमकं काय घडलं?

fireworks factory blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; सहा जणांचा मृत्यू, चार जखमी!

SCROLL FOR NEXT