struggler saala 3 season 3 coming soon  sakal
मनोरंजन

पुन्हा होणार चावट पणाचा कहर, येतोय 'स्ट्रगरल साला'चा तिसरा सीजन..

तरुणांच्या आवडत्या आणि काहीशा चावट अशा 'स्ट्रगलर साला'चा तिसरा सीजन लवकरच येत आहे.

नीलेश अडसूळ

struggler saala : विजू माने दिग्दर्शित आणि अभिनेता संतोष जुवेकर, कुशल बद्रिके आणि अभिजीत चव्हाण यांनी गाजवलेली 'स्ट्रगलर साला' ही मराठी यु ट्यूब सिरीज एक वेगळा प्रयोग ठरली. तरुणांची भाषा, थोडीशी चावट शैली आणि शिव्या असा बाज घेऊन या सिरीजचे तरुणांचे तुफान मनोरंजन केले. बघता बघता या सीरिजने दोन सीजन झाले. या दोन्ही सीजन ला भरपूर प्रतिसाद मिळाला. आता याचा तिसरा सीजन कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते,. अखेर याची घोषणा झाली आहे. लवकरच 'स्ट्रगलर साला'चा तिसरा सीजन आपल्या भेटीला येत आहे.

(struggler saala 3 season 3 coming soon)

संतोष जुवेकर (santosh juvekar), कुशल बद्रिके (kushal badrike), विजू माने (viju mane) यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक लाईव्ह करत 'स्ट्रगलर साला ३' ची घोषणा केली. यावेळी केवळ घोषणा केली नाही तर चाहत्यांशी संवाद साधत या तिघांनी धमाल मस्ती केली. यावेळी चाहत्यांनीही भन्नाट प्रश्नांचा भडीमार केला. शूटटू म्हणजे काय, बाबाचा पाव भाजीचा भाग दाखवा तसेच शिवाय भूत स्पेशल भागाचीही चर्चा करण्यात आली. तसेच 'या सिरिज मधली भाषा अश्लील नसून ही मित्रांची भाषा आहे. चार मित्र एकमेकांशी जया भाषेत बोलतात त्याच भाषेत आम्ही बोलतो. स्क्रिप्ट मध्ये कधीही शिव्या नसतात, त्या चित्रीकरणा दरम्यान ओघाने येतात,' असं यावेळी कुशल म्हणाला.

एका चाहत्याने तर गमतीने तर चक्क शिव्या वाढवा.. असंही सांगितलं. ..तर येत्या पर्वात म्हणजे सीजन ३ मध्ये प्रत्येक भागात नवीन कलाकार, नवीन घटना येतील अशी खात्री विजु माने यांनी दिली. यावेळी स्ट्रगलर साला मधील महत्वाचा घटक अभिनेता अभिजीत चव्हाण म्हणजे बाबा उपस्थित नव्हता. चाहत्यांनी त्याची वारंवार चौकशी केली. पण तो काही अपरिहार्य कारणामुळे गावी गेला असल्याचे यावेळी समजले. पण या घोषणेनंतर स्ट्रगलर सालाचा तिसरा इसजन कधी येणार याची उत्सुकता तरुण प्रेक्षकांना लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT