Subhash ghai ram lakhan film completes 32 years anil Kapoor hit gulshan grover not talked to each other many years 
मनोरंजन

अनिलचा पंच गुलशन भाऊंच्या डोळ्यावर, कित्येक वर्षे बोलणंच नाही

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमधील कलाकार भलेही एकमेकांचे फार कौतूक करत असतील मात्र त्यांच्यातील भांडणे ही दबक्या आवाजात सुरु असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. राम लखन हा प्रसिध्द चित्रपट आजही त्या चित्रपटाच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. त्यात अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया आणि माधुरी दीक्षित हे कलाकार होते. बॉक्स ऑफिसवर प्रचंड लोकप्रिय झालेला चित्रपट म्हणून राम लखनचे नाव घ्यावे लागते.

राम लखन मध्ये खलनायकाची भूमिका गुलशन ग्रोव्हरनं केली होती. त्यांची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. मात्र या चित्रपटानंतर अनिल कपूर आणि गुलशन ग्रोव्हर हे एकमेकांशी अनेक वर्षे बोलत नव्हते. याचे कारणही अजब होते. सुभाष घई दिग्दर्शित राम लखन या चित्रपटाला नुकतीच 32 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं घई यांनी सोशल मीडियावर राम लखनमधल्या कलाकारांचा एक फोटो शेयर केला आहे. राम लखन मध्ये जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या कलाकारांशिवाय निगेटिव्ह भूमिकेत असणा-या गुलशन ग्रोव्हर यांनी आपल्या अभिनयानं सर्वांना जिंकून घेतलं होतं.

ज्यावेळी राम लखनचे चित्रिकरण सुरु होते तेव्हा एका फाईट सीनमध्ये अनिल आणि गुलशन यांच्यात वाद झाला. त्याचे कारण म्हणजे अनिल यांच्याकडून गुलशन यांच्या डोळ्याला झालेली दुखापत होते. अनिल यांनी गुलशन यांच्या डोळ्यावर एक जोरात पंच मारला. त्यामुळे ते रागाला गेले. त्यावरुन नाराज झालेल्या गुलशन यांनी अनिल यांना घरी जाऊन शिवीगाळही केली होती. त्यावेळी अनिल यांनाही राग आला होता. त्यांनी गुलशन यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे बंद झाले. पुढे अनेक वर्षे हा अबोला कायम होता. शेवटी अनिल कपूर यांचे भाऊ बोनी कपूर य़ांनी दोघात समेट घडून आणला होता. पुढे एका चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले. तो चित्रपट म्हणजे लोफर. 

राम लखनची दुसरी गोष्ट म्हणजे 1989 मध्ये झालेला हा चित्रपट कमालीचा लोकप्रिय झाला होता. त्यावेळी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून राम लखनचे नाव घेतले गेले. अनिल यांच्या लखनच्या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 

 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT