Subhedar Marathi Movie Box Office Collection Day 1 Esakal
मनोरंजन

Subhedar Movie Box Office Collection Day 1: सुभेदार सिनेमा प्रेक्षकांना कसा वाटला? पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी!

Vaishali Patil

Subhedar Movie Box Office Collection Day 1: दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार हा सिनेमा 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पालचा शिवराज अष्टकातील पाचवा सिनेमा सुभेदारची सध्या सगळीकडे उत्सुकता लागून होती. सिनेमाच्या टिमनेही सुभेदारचं तगडं प्रमोशन केल होते.

शिवराज अष्टकातल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' या चारही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या सिनेमाला आता प्रेक्षकांची पसंती मिळते का याकडे निर्माते आणि चाहत्यांच्या नजरा होत्या.

25 ऑगस्टला सर्वत्र हा सिनेमा रिलिज झाला. राज्यातील जवळपास 350हून अधिक चित्रपटगृहांत या सिनेमांचे 900 पेक्षा जास्त शोज दाखवण्यात आले.

त्याचबरोबर भारतासह इतर सहा देशांत 'सुभेदार' प्रदर्शित झाला करण्यात आला आता या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यावरुन कळेलच. या सिनेमाने पहिल्या पहिल्याच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

Sacnilkच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार या सिनेमानं पहिल्या दिवशी 1.2 कोटींची कमाई केली आहे.

एकीकडे बॉलिवूडमध्ये 'ड्रीम गर्ल 2', 'गदर 2' आणि 'OMG 2' हे चित्रपट प्रदर्शित झाले आहे आता त्याच्या तुलनेत 'सुभेदार' चित्रपटाच्या कलेक्शनचे समोर आलेले हे आकडे समाधान कारक आहेत. तर विकेंडला हा 'सुभेदार'च्या कमाईत वाढ होऊ शकते.

चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त, दिग्पाल लांजेकर, अजिंक्य ननावरे, ऋषी सक्सेना, नूपुर दैठणकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अर्णव पेंढरकर आदी मराठीतल्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

तर दुसरीकडे "प्रदर्शनाआधीच बुक माय शो वर 40K+ इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला पहिला मराठी चित्रपट 'सुभेदार' !" हा पहिला मराठी सिनेमा ठरलाय.

अशाप्रकारे ४० हजारांहून अधिक प्रेक्षक रिलीजआधीच सुभेदार सिनेमा पहायला उत्सुक होते. त्यामुळे नक्कीच चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT