Subhedar Movie Esakal
मनोरंजन

Subhedar Movie: हातात भगवा आणि थिएटरमध्ये सुभेदारची हवा, चाहत्यांनी केला एकच जल्लोष, व्हिडिओ व्हायरल

'सुभेदार' या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी तुफान गर्दी करत आहेत.

Vaishali Patil

Subhedar Movie Video Viral: सध्या मराठी सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगली हवा आहे. गेल्या काही महिन्यात मराठी सिनेमा वेड, बाईपण बारी देवा यांसारख्या सिनेमांनतर आता आणखी एक सिनेमाचं वादळ बॉक्स ऑफिसवर घोंघावत आहे.

तो सिनेमा म्हणजे सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा 'सुभेदार... गड आला पण...' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आता या सिनेमाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर हे पुन्हा एकदा रसिकांना शिवकालीन इतिहासाच्या काळात नेण्यात ते यशस्वी झाले आहेत. चहूबाजूंनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रेक्षकही प्रचंड उत्साहात 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा देत 'सुभेदार' सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये एकच गर्दी करत आहेत.

'सुभेदार' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील शूरवीर योद्धे सुभेदार तान्हाजीराव मालुसरे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे. या चित्रपटाचा विषय केवळ किल्ले कोंढाण्यापुरता मर्यादित नसून, सुभेदार मालुसरेंच्या यांच्या पात्राची ओळख शिवभक्तांना हा सिनेमा करुन देत आहे.

या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी तुफान गर्दी करत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात सिनेमा संपल्यानंतर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये एकच जल्लोष केला आहे. हातात भगवा झेंडा घेत प्रेक्षक शिवरायांच्या घोषणा देत आहेत.

शिवराज अष्टकातल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' या चारही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होत आता त्यातच यातील पाचवा भाग यशानंतर आता शिवराज अष्टकातलं पाचवं पुष्प 'सुभेदार' या चित्रपटाला देखील तसाच प्रतिसाद प्रेक्षकांचा पहायला मिळत आहे.

या सिनेमाने पहिल्या दिवशी 1.2 कोटींची आणि दुसऱ्या दिवशी 1.75 कोटींची कमाई केली आहे. तर आता या चित्रपटाची एकून कमाई 2.80 कोटी इतकी झाली आहे.

सुभेदार सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त, दिग्पाल लांजेकर, अजिंक्य ननावरे, ऋषी सक्सेना, नूपुर दैठणकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अर्णव पेंढरकर आदी मराठीतल्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT