subhedar marathi movie latest box office report weekend collection know details
subhedar marathi movie latest box office report weekend collection know details SAKAL
मनोरंजन

Subhedar: गाजतोय सिंहगडाचा पोवाडा! रविवारी सुभेदारच्या कमाईची कोटीच्या कोटी उड्डाणे, पाहा कमाईचे आकडे

Devendra Jadhav

Subhedar Movie Box Office Collection News: सुभेदार सिनेमा २५ ऑगस्टला रिलीज झालाय. सुभेदार सिनेमा प्रदर्शनापासुनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

सुभेदार प्रदर्शित झाला आणि सिनेमाने बॉक्स ऑफीसवर सुद्धा दमदार कामगिरी करायला सुरुवात केली. सुभेदार सिनेमाच्या तिसऱ्या दिवशीचा बॉक्स ऑफीस रिपोर्ट सुरु केलाय. सिनेमाने विकेंडच्या दिवशी बक्कळ पैसे कमावले आहेत.

(subhedar marathi movie latest box office report)

सुभेदार सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट

सुभेदार सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय. sacnilk च्या अहवालानुसार सुभेदारने रविवारी पहिल्या दोन दिवसांपेक्षा जास्त कमाई केलीय. रविवारी सुभेदारने २.३० कोटींची कमाई केलीय.

यावरुन पहिल्या दोन दिवसांची आणि रविवारची कमाई एकत्र करुन सुभेदारने ५.२५ कोटींची कमाई केलीय. त्यामुळे सुभेदार सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असुन सुपरहिट झालाय, असं म्हणता येईल.

सुभेदार सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

'सुभेदार' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील शूरवीर योद्धे सुभेदार तान्हाजीराव मालुसरे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे. या चित्रपटाचा विषय केवळ किल्ले कोंढाण्यापुरता मर्यादित नसून, सुभेदार मालुसरेंच्या यांच्या पात्राची ओळख शिवभक्तांना हा सिनेमा करुन देत आहे.

या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी तुफान गर्दी करत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात सिनेमा संपल्यानंतर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये एकच जल्लोष केला आहे. हातात भगवा झेंडा घेत प्रेक्षक शिवरायांच्या घोषणा देत आहेत.

सुभेदार सिनेमा शिवराज अष्टक मधला पाचवा सिनेमा

शिवराज अष्टकातल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' या चारही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होत आता त्यातच यातील पाचवा भाग यशानंतर आता शिवराज अष्टकातलं पाचवं पुष्प 'सुभेदार' या चित्रपटाला देखील तसाच प्रतिसाद प्रेक्षकांचा पहायला मिळत आहे.


सुभेदार सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त, दिग्पाल लांजेकर, अजिंक्य ननावरे, ऋषी सक्सेना, नूपुर दैठणकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अर्णव पेंढरकर आदी मराठीतल्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT