subhedar movie actress smita shewale buy new  SAKAL
मनोरंजन

Subhedar: एकीकडे सुभेदार सुपरहिट, दुसरीकडे नवीन घरात प्रवेश, मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आयुष्यात दुग्धशर्करा योग

सुभेदार सिनेमातील अभिनेत्री स्मिता शेवाळेने नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय

Devendra Jadhav

Subhedar Movie News: सुभेदार सिनेमा सुपरहिट झाला. सुभेदार सिनेमाने बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केलीय. सुभेदार सिनेमा पाहायला मराठी प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केलीय.

एकीकडे सुभेदार सिनेमाने बॉक्स ऑफीसवर दमदार कामगिरी केली तर दुसरीकडे सुभेदार मधील मराठी अभिनेत्रीने नवीन घर घेतलंय

अभिनेत्री स्मिता शेवाळेने नवीन घर घेतलं

सुभेदार सिनेमात तान्हाजी मालुकरेंच्या पत्नीची भुमिका साकारणारी अभिनेत्री स्मिता शेवाळेने नवीन घर विकत घेतलंय.

सुभेदार सिनेमात स्मिता शेवाळेने तान्हाजी मालुसरेंच्या पत्नीच्या भुमिकेत अभिनय करुन सर्वांचं मन जिंकलं. आता स्मिता शेवाळेने सोशल मिडीयावर नवीन घरातील गृहप्रवेशाचे व्हिडीओ पोस्ट करुन सर्वांना आनंदाची बातमी दिली.

घर म्हणजे केवळ घर नसतं. असल्या जरी चार भिंती. तरी जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असतं.... आपुलकीच्या झुरोक्यातून इथे प्रेमाचं वारं वाहत असतं... अशी पोस्ट करत स्मिताने सर्वांसोबत तिच्या मनातल्या भावना शेअर केल्यात.

सुभेदार सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट

सुभेदार सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय. sacnilk च्या अहवालानुसार सुभेदारने रविवारी पहिल्या दोन दिवसांपेक्षा जास्त कमाई केलीय. रविवारी सुभेदारने २.३० कोटींची कमाई केलीय.

यावरुन पहिल्या दोन दिवसांची आणि रविवारची कमाई एकत्र करुन सुभेदारने ५.२५ कोटींची कमाई केलीय. त्यामुळे सुभेदार सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असुन सुपरहिट झालाय, असं म्हणता येईल.

सुभेदार सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

'सुभेदार' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील शूरवीर योद्धे सुभेदार तान्हाजीराव मालुसरे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे. या चित्रपटाचा विषय केवळ किल्ले कोंढाण्यापुरता मर्यादित नसून, सुभेदार मालुसरेंच्या यांच्या पात्राची ओळख शिवभक्तांना हा सिनेमा करुन देत आहे.

या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी तुफान गर्दी करत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात सिनेमा संपल्यानंतर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये एकच जल्लोष केला आहे. हातात भगवा झेंडा घेत प्रेक्षक शिवरायांच्या घोषणा देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT